Michael Schumacher : फॉर्म्युला वन बादशाह मायकेल शुमाकर मुलीच्या लग्नाच्या निमित्ताने लोकांसमोर

Michael Schumacher : शुमाकर फक्त खाणाखुणांच्या मदतीने जवळच्यांशी संवाद साधतो.

83
Michael Schumacher : फॉर्म्युला वन बादशाह मायकेल शुमाकर मुलीच्या लग्नाच्या निमित्ताने लोकांसमोर
  • ऋजुता लुकतुके

२०१३ मध्ये जीवावर बेतलेल्या स्किइंग अपघातानंतर फॉर्म्युला वनचा बादशाह मायकेल शुमाकरचं (Michael Schumacher) आयुष्यच बदललं आहे. त्याच्या तब्येतीचे सगळे अपडेट अगदी गुप्त ठेवले जातात. तो लोकांमध्ये मिसळतही नाही. तो आपल्या कुटुंबीयां समवेत स्वीत्झर्लंड इथं राहत असल्याची बातमी मध्यंतरी पसरली होती. पण, अलीकडेच युरोपीयन मीडियाने शुमाकरची मुलगी जिनाच्या लग्नात शुमाकर सहभागी झाल्याची बातमी दिली आहे. स्पेनमधील मोलोर्का इथं हा विवाह सोहळा पार पडला. आलेल्या पाहुण्यांना तिथले फोटो घेण्याची परवानगी नव्हती.

पण, या सोहळ्यानंतर अल्पाईन फॉर्म्युला वन निरीक्षक फ्लाविओ ब्रायटोरची पत्नी एलिझाबेटा ग्रेगोरासी यांनी शुमाकरविषयी एक जाहीर भाष्य केलं आहे. ‘मायकेल बोलत नाही. तो फक्त डोळ्यांनी त्याला काय हवं, नको ते सांगतो. ते आता स्पेनमध्ये राहतात. फक्त तीन लोक त्यांना भेटू शकतात. हे तीन लोक कोण आहेत ते मला माहीत आहे. शुमाकरची (Michael Schumacher) पत्नी कोरिनाने स्पेनमधील रियाल मद्रिद क्लबच्या मालकांकडून हा व्हिला विकत घेतला आहे,’ असं ग्रेगोरासी यांनी एका इटालियन टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं.

(हेही वाचा – Virat Kohli : ऑस्ट्रेलियन संघाकडून भारताने असा मिळवला आदर, ऐका विराटच्या शब्दात)

शुमाकर नंतरचा फेरारीचा ड्रायव्हर सेबॅस्टियन व्हिटलने अलीकडेच शुमाकरची तब्येत फारशी चांगली नसल्याचं मीडियासमोर सांगितलं होतं. तर शुमाकरचे वकील फेलिक्स डॅम यांनी खाजगीपणा जपण्यासाठी शुमाकर कुटुंब त्याच्या तब्येतीची माहिती उघड करणार नसल्याचं सांगितलं आहे. ‘शुमाकरचे तब्येतीचे अहवाल प्रसिद्ध करावेत, अशी मागणी दरवेळी होत असते. शुमाकरच्या (Michael Schumacher) पत्नीने तसा विचारही केला होता. पण, मग ही मागणी नेहमीचीच झाली तर तिला ते नको होते. प्रश्न कुटुंबीयांचं खाजगीपण जपण्याचा आहे. त्यामुळे मग त्यांनी निर्णय घेतला की, कुठलीही माहिती द्यायची नाही,’ असं डॅम काही महिन्यांपूर्वी म्हणाले होते.

२०१३ मध्ये फ्रान्समध्ये कुटुंबाबरोबर सहलीला गेला असताना मुलाबरोबर स्किइंगची मजा लुटताना मायकेल शुमाकरला भयंकर अपघात झाला होता. त्यानंतर काही वर्षं तो व्हेंटिलेटरवर कोमात होता. पहिल्या एका वर्षानंतर त्याच्या कुटुंबीयांनी त्याच्याविषयीची सर्व माहिती गुप्त ठेवली आहे. तो लोकांसमोरही येत नाही.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.