जगातील सर्वात जास्त मेमरी असलेलं कार्ड लाॅन्च; पावणे चार लाख फोटो साठवता येणार

173

MicronSD ने Embedded World 2022 Conference मधून जगातील सर्वात जास्त स्टोरेज असलेला MicronSD कार्ड i400 सादर केलं आहे. या कार्डमध्ये 1.5TB स्टोरेज आहे.

जगातील सर्वात जास्त स्टोरेज असलेल्या या कार्डची जास्त माहिती समोर आली नाही. हे कार्ड सामान्य ग्राहकांसाठी उपलब्ध होणार नाही तर फक्त एंटरप्राइड मार्केटसाठी सादर करण्यात आले आहे. कंपनीने स्पष्ट केले आहे की हे एक इंडस्ट्री- ग्रेड प्रोडक्ट असेल.

पावणे चार लाख फोटोज साठवता येणार

1.5 TB microSD कार्डसह 5 वर्षांपर्यंतची 24x 7 हाय क्वाॅलिटी व्हिडीओ रेकाॅर्डिंग साठवून ठेवता येईल, असा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे या कार्डचा वापर डॅश कॅम, होम सिक्योरिटी साॅल्यूशन, पोलिसांचे बाॅडी कॅमेरा इत्यादी डिवाइसमध्ये मोठ्या प्रमाणावर होऊ शकतो. या कार्डमध्ये 3 लाख 75 हजार फोटोज, 350 DVDs, 70 Blu-rays किंवा 15 हजार Zip disks सहज साठवून ठेवले जाऊ शकतात.

( हेही वाचा: तेव्हाच शिवसेना होणार एकनाथ शिंदेंची! )

किंमत

कंपनीने microल i400 microSD कार्डची किंमत आणि उपलब्धतेची माहिती सांगितलेली नाही. मात्र SanDisk ने 2019 मध्ये सर्वात आधी सादर केलेले 1TB microSD कार्ड सध्या 450 डाॅलर्स मध्ये विकले जात आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.