मायक्रोसॉफ्टच्या सर्व्हरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने जगभरात बँकांपासून विमान वाहतुकीपर्यंतच्या सेवा ठप्प झाल्या आहेत. जगभरातील अनेक वापरकर्त्यांच्या विंडो सिस्टिमवर ब्ल्यू स्क्रीन येत आहे. अनेक क्षेत्रांमध्ये या बिघाडाचा मोठा फटका बसल्याचे पाहायला मिळत आहे. याविषयी क्राऊट स्ट्राइकच्या सीईओंनी याविषयी माहिती दिली आहे. (Microsoft Global Outage)
(हेही वाचा – Microsoft Windows Crowdstrike : ब्लू स्क्रीन ऑफ डेथ; मायक्रोसॉफ्टमधील बिघाडामुळे कोणत्या कोणत्या सेवा झाल्या प्रभावित ?)
CrowdStrike चे अध्यक्ष आणि CEO जॉर्ज कुर्ट्झ यांनी सांगितले की, CrowdStrike Windows होस्ट्ससाठी एका अपडेटमध्ये आढळलेल्या दोषामुळे प्रभावित झालेल्या ग्राहकांसोबत सक्रीयपणे काम करत आहे. Mac आणि Linux होस्टवर परिणाम होत नाही. हा सायबर हल्ला नाही. ही समस्या आहे. नेमका बिघाड शोधला आहे. त्याचे लवकरात लवकर निराकरण करण्यावर भर दिला जात आहे.
राजीव चंद्रशेखर यांची मायक्रोसॉफ्टसह चर्चामायक्रोसॉफ्ट 365 आणि मायक्रोसॉफ्ट सूट लाखो भारतीय वापरतात. या प्लॅटफॉर्मवरील कोणत्याही तांत्रिक बिघाडामुळे अनेक कंपन्यांचे व्यवसाय आणि ऑपरेशन्स विस्कळीत होत आहेत. मला आशा आहे की, मायक्रोसॉफ्ट सेवा लवकर पूर्ववत होईल. सेवा लवकरात लवकर पूर्ववत होईल, हे सुनिश्चित करण्यासाठी भारत सरकार मायक्रोसॉफ्टशी चर्चा करत आहे.
सायंकाळी ५ वाजेपर्यंत थांबा; विमान कंपन्यांचे प्रवाशांना माहिती
मायक्रोसॉफ्टमधील तांत्रिक बिघाडाबाबत याव्यतिरिक्त कोणतीही अधिक माहिती देण्यात आलेली नाही. काही उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. अनेकांना सायंकाळी ५ वाजेपर्यंत थांबा. पुढील अपडेट दिली जाईल, असे सांगितले जात आहे. मला बंगळुरूला जायचे आहे, अशी प्रतिक्रिया चेन्नई विमानतळावरील एका प्रवाशाने दिली.
स्टेट बँकेच्या सेवांवर मायक्रोसॉफ्ट बिघाडाचा परिणाम नाही
स्टेट बँक ऑफ इंडियाने (State Bank of India) जाहीर केले की, मायक्रोसॉफ्ट ग्लोबल तांत्रिक बिघाडामुळे त्यांच्या सिस्टमवर कोणताही परिणाम झाला नाही. भारतातील अनेकांसह जगभरातील Microsoft वापरकर्त्यांवर परिणाम झाला आहे. आमच्याकडील सर्व सेवा सुरळीतपणे सुरू आहेत, अशी माहिती एसबीआयचे चेअरमन दिनेश खारा यांनी सांगितली. (Microsoft Global Outage)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community