-
ऋजुता लुकतुके
मायक्रोसॉफ्ट कंपनीने (Microsoft India) पुण्यातील हिंजेवाडीत ५२० कोटी रुपयांची जमीन खरेदी केल्याचं स्क्वेअर यार्ड्स वेबसाईटने म्हटलं आहे. या व्यवहार नुकताच पार पडला असून यातून कंपनीची भारतात गुंतवणूक करण्याची इच्छा आणि भारतावरील विश्वासच अधोरेखित होतोय. आयटी क्षेत्रात या गुंतवणुकीविषयी चर्चा सुरू झाली आहे. गेल्या काही वर्षांत कंपनीने भारतात डेटा सेंटर उभी करण्यासाठी खास मेहनत घेतली आहे. आताचा हा व्यवहार ऑगस्ट २०२४ चा आहे. यात मायक्रोसॉफ्ट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनी मार्फत पैशाची देवाण घेवाण झाली आहे. (Microsoft India)
एकूण १६.४ हेक्टरची ही जागा आहे. इंडोग्लोबल इन्फोटेक सिटी या कंपनीने जागा मायक्रोसॉफ्ट कंपनीला विकली आहे. या पूर्ण व्यवहारात कंपनीने ३३ कोटी रुपये स्टँप ड्युटी म्हणून भरले आहेत. तर नोंदणी शुल्क ३० हजार रुपये इतकं होतं. यापूर्वी २०२२ मध्येही मायक्रोसॉफ्ट कंपनीने पिंपरी – चिंचवड भागातच २५ एकर जागा खरेदी केली होती. तेव्हाचा व्यवहार हा ३२० कोटी रुपयांचा होता. (Microsoft India)
(हेही वाचा- Ayushman Bharat : आयुष्यमान भारत योजनेच्या विस्तारामुळे सरकारवर साडेतीन हजार कोटींचा भार)
तर २०२४ मध्ये कंपनीने हैद्राबाद इथं ४८ एकर जागा खरेदी केली होती. ही बहुतांश जागा ही डेटा सेंटरसाठी वापरली जाणार आहे. कंपनीची आधीची मुंबई, पुणे आणि चेन्नई इथं डेटा सेंटर आहेत. याशिवाय कंपनीची मुंबई, बंगळुरू, दिल्ली, पुणे आणि हैद्राबाद इथं कार्यालयं आहेत. भारतात कंपनीचे २३,००० कर्मचारी आहेत. जागेतील या गुंतवणुकी खेरिज कंपनीला २०२५ पर्यंत भारतात एक कौशल्य विकास कार्यक्रमही राबवायचा आहे. ॲडव्हांटेज इंडिया असं या कार्यक्रमाचं नाव असून या अंतर्गत २० लाख भारतीय तरुणांना एआय आणि डिजिटल कौशल्य शिकवण्याचा उपक्रम कंपनीने सुरू केला आहे. (Microsoft India)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community