- ऋजुता लुकतुके
मायक्रोसॉफ्ट कंपनीने अलीकडेच कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित चॅट जीपीटी प्रोग्राम लोकांमध्ये चांगला रुजवून या क्षेत्रात आघाडी घेतली आहे. चॅट जीपीटीसाठी त्यांनी ओपन एआय कंपनीशी करार करून चॅट जीपीटी मायक्रोसॉफ्ट संगणकांत उपलब्ध करून दिला. तो प्रयोग यशस्वी झाला आणि अमेरिकन शेअर बाजारात कंपनीचा शेअर वर्षभरात तब्बल ५७ टक्क्यांनी वाढून ४०० अमेरिकन डॉलरच्या पलिकडे गेला. कंपनीचं शेअर बाजारातील भाग भांडवल त्यामुळे पहिल्यांदाच ४ ट्रिलियन अमेरिकन डॉलरच्या वर गेलं. (Microsoft Job Cuts)
असं असताना कंपनी यावर्षी गेमिंग विभागात मात्र कर्मचारी कपात करण्याच्या तयारीत आहे. यंदा तब्बल १,९०० कर्मचाऱ्यांना कंपनी नारळ देणार आहे. (Microsoft Job Cuts)
Story on the Microsoft layoffs including the gaming division: https://t.co/AsC6qqaZHr
— Jason Schreier (@jasonschreier) January 18, 2023
(हेही वाचा – ICC ODI Player of the Year : विराट कोहली आयसीसीच्या २०२३ च्या सर्वोत्तम एकदिवसीय खेळाडू पुरस्काराचा मानकरी)
हे आहे कर्मचारी कपात करण्याचे कारण
यामध्ये अलीकडेच कंपनीने विकत घेतलेल्या ॲक्टिव्हिजन ब्लिझार्ड या कंपनीचे कर्मचारीही असतील. मायक्रोसॉफ्टच्या गेमिंग विभागाचे प्रमुख फिल स्पेन्सर यांनी नुकताच कर्मचाऱ्यांना एक ईमेल लिहिला आहे. १९ जानेवारीचा हा ईमेल ब्लूमबर्ग या मीडिया कंपनी पाहिला आहे. आणि त्यानंतर त्यांनी ही बातमी दिली आहे. (Microsoft Job Cuts)
मायक्रोसॉफ्टच्या गेमिंग विभागात सध्या २२,००० कर्मचारी आहेत. आणि त्यातील ८ टक्के लोकांना त्यांच्या आतापर्यंतच्या कामगिरीचा आढावा घेऊन काढून टाकण्यात येणार असल्याचं कंपनीने ईमेलमध्ये कळवलं आहे. मायक्रोसॉफ्टने ॲक्टिव्हीजन ब्लिझार्ड ही कंपनी तीन महिन्यांपूर्वीच विकत घेतली. आणि त्यानंतर लगेचच ही कर्मचारी कपात होत आहे. कर्मचाऱ्यांची पुन्हा वर्गवार क्रमवारी करण्याच्या उद्देशाने ही कपात होत असल्याचं ईमेलमध्ये म्हटलं आहे. (Microsoft Job Cuts)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community