Microsoft Outage: विमानतळांवर हाताने लिहिले बोर्डिंग पास; प्रवाशांना आठवले जुने दिवस

166
Microsoft Outage: विमानतळांवर हाताने लिहिले बोर्डिंग पास; प्रवाशांना आठवले जुने दिवस
Microsoft Outage: विमानतळांवर हाताने लिहिले बोर्डिंग पास; प्रवाशांना आठवले जुने दिवस

मायक्रोसॉफ्टच्या सर्व्हरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने जगभरात बँकांपासून विमान वाहतुकीपर्यंतच्या सेवा ठप्प झाल्या आहेत. अनेक देशांनी आपत्कालीन बैठक बोलावली आहे. मायक्रोसॉफ्टने यावर काम करत असल्याचे म्हटले असून काही सेवा हळू हळू पूर्ववत होत असल्याचे सांगितले आहे. तरीही अनेक ठिकाणी काम ठप्प झालेले आहे. अशातच जग मायक्रोसॉफ्टवर किती अवलंबून आहे याचा अनुभव आज सगळ्यांनी घेतला आहे. (Microsoft Outage)

(हेही वाचा – दूधाला हमीभाव देण्यासाठी मंत्री Radhakrishna Vikhe Patil यांची केंद्राकडे मागणी)

Azure बॅकएंड वर्कलोडच्या कॉन्फिगरेशनमध्ये बदल करण्यात आल्याने ही समस्या निर्माण झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. यामुळे स्टोरेज आणि कॉम्प्युटर रिसोर्सेसमध्ये व्यत्यय आला व कनेक्टिव्हिटी बंद झाली. या त्रुटीमुळे मायक्रोसॉफ्टच्या सेवांवर परिणाम झाला आहे.

मायक्रोसॉफ्ट येण्यापूर्वी जगातील सर्व कामे हातानेच केली जात होती. मायक्रोसॉफ्टने यात डिजिटलायझेशन सुरु केले. विमानांचे परिचालनही अनेक वर्षांपूर्वी मॅन्युअलीच व्हायचे. प्रवाशांचे नाव, त्याची रजिस्टरमध्ये नोंद, विमानाच्या नोंदी आदी साऱ्या लेखी ठेवल्या जात असत. आज मायक्रोसॉफ्ट ठप्प झाल्याने जवळजवळ ५० वर्षांनंतर हैदराबाद आणि भुवनेश्वर विमानतळावर हाताने लिहून बोर्डिंग पास बनविण्यात आले.

कुठे कुठे झाला परिणाम ?

अनेक देशांचे शेअर बाजार बंद पड़ले आहेत. विमानसेवा ठप्प झाल्या आहेत. लोकांना वाटले की, ५० वर्षे ते मागे गेले आहेत. कंपन्यांची कामे थांबली आहेत. टीव्ही चॅनल बंद पडले आहेत. ट्रेन, मेट्रोचे संचालन ठप्प झाले आहे. अनेकांचे कॉम्प्युटर बंद पडले आहेत. सर्व्हरमधील एका नादुरुस्तीमुळे अवघे जग ठप्प झाले आहे. मायक्रोसॉफ्ट विंडोज १० च्या ऑपरेटिंग सिस्टिममध्ये खराबी आली आहे. मायक्रोसॉफ्टच्या सेवा घेणाऱ्यांना सायबर सिक्युरिटी पुरविणाऱ्या क्राऊड स्ट्राईकच्या कामात खराबी आल्याने ही स्थिती निर्माण झाली आहे. CrowdStrike ही सायबर सुरक्षा फर्म आहे. हॅकर्स, सायबर हल्ले, रॅन्समवेअर आणि डेटा लीकपासून ही कंपनी सेवा घेणाऱ्या कंपन्यांचे संरक्षण करते. (Microsoft Outage)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.