- ऋजुता लुकतुके
मायक्रोसॉफ्ट ही अमेरिकन टेक कंपनी भारतातील ७५,००० महिलांना कौशल्य विकासात मदत करणार आहे. २०२४ मध्येच हा अभ्यासक्रम पार पडणार असून या अंतर्गत महिलांना सॉफ्टवेअर डेव्हलपिंगचं प्रशिक्षण देण्यात येईल. मायक्रोसॉफ्ट कंपनीचे सीईओ सत्या नाडेला (Satya Nadella) यांनी बंगळुरूमध्ये ही माहिती दिली. (Microsoft to Train Indian Women)
‘हा फक्त कौशल्य विकास नाही आहे. तर त्यातून लोकांना उपजीविकेचं साधन मिळावं, असा कंपनीचा प्रयत्न आहे. त्यासाठीच मायक्रोसॉफ्टने कोड-विदाऊट बॅरिअर्स हा कार्यक्रम सुरू केला आहे,’ असं नाडेला बंगळुरू इथं मायक्रोसॉफ्ट बिल्ड या कार्यक्रमात बोलताना म्हणाले. (Microsoft to Train Indian Women)
सत्या नाडेला दरवर्षी सुरुवातीच्या महिन्यात दोन दिवस भारत दौऱ्यावर येतात. यंदाच्या त्यांच्या भेटीची मध्यवर्ती संकल्पना होती कृत्रिम बुद्धिमत्ता (artificial intelligence) क्षेतातील विकासाच्या संधी. (Microsoft to Train Indian Women)
Satya Nadella announces expansion of ‘Code Without Barrier’ prog; to train 75K women developers in India#Microsoft #SatyaNadella #India #CodeWithoutBarrier https://t.co/246oGU65uE
— NewsDrum (@thenewsdrum) February 8, 2024
(हेही वाचा – Bharat Ratna : भारतरत्न पुरस्कारांमागची राजकीय गणिते)
सप्टेंबर २०२१ मध्ये मायक्रोसॉफ्ट कंपनीने ‘कोड-विदाऊट बॅरिअर्स’ हा कार्यक्रम सुरू केला आहे. या अंतर्गत कृत्रिम बुद्धिमत्ता आणि इतर डिजिटल टेक क्षेत्रात असलेला लिंगभेद कमी करणयाचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे. आशिया-पॅसिफिक भागातील देशांसाठी हा कार्यक्रम आहे. आणि मायक्रोसॉफ्टच्या बरोबरीने या भागातील १३ टेक कंपन्या या उपक्रमात सहभागी झाल्या आहेत. (Microsoft to Train Indian Women)
महिलांना अभ्यासक्रम शिकवण्याबरोबरच त्यासाठी सर्टिफिकिटही देण्यात येतं. कोड-विदाऊट बॅरिअर्स हा कार्यक्रम भारतात पहिल्यांदाच होत आहे. (Microsoft to Train Indian Women)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community