Microsoft Windows Crash : मायक्रोसॉफ्टमध्ये तांत्रिक समस्या, जगभरातील विमान उड्डाणवर परिणाम

345
Microsoft Windows Crash : मायक्रोसॉफ्टमध्ये तांत्रिक समस्या, जगभरातील विमान उड्डाणवर परिणाम
Microsoft Windows Crash : मायक्रोसॉफ्टमध्ये तांत्रिक समस्या, जगभरातील विमान उड्डाणवर परिणाम

Microsoft Windows Crash जगभरातील संगणक आणि लॅपटॉप सध्या ब्लू स्क्रीन ऑफ डेथला (बीएसओडी) बळी पडत आहेत. संबंधित घटना ही शुक्रवारी (१९ जुलै) रोजी घडली असून, प्रसिद्ध सायबर सुरक्षा कंपनी CrowdStrike ने एक अपडेट सांगितली. ज्यानंतर MS Windows वर चालणारे सर्व संगणक आणि लॅपटॉप अचानक क्रॅश होत आहेत.

(हेही वाचा- Virat Kohli : विराट कोहलीची ब्रँड व्हॅल्यू बॉलिवूड स्टारपेक्षाही जास्त; रणवीर, शाहरुखला टाकलं मागे )

दरम्यान, या घटनेमुळे मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशनच्या क्लाउड सेवेतील तांत्रिक समस्येमुळे, भारतासह जगभरातील उड्डाणांवर मोठ्या प्रमाणावर परिणाम झाला. यामुळे काही उड्डाणे रद्द करावी लागली तर काही उड्डाणांना उशीर झाला. (Microsoft Windows Crash)

आकासा एअरलाइन्सने म्हटले आहे की त्यांच्या काही ऑनलाइन सेवा मुंबई आणि दिल्ली विमानतळांवर तात्पुरत्या स्वरूपात अनुपलब्ध असतील. बुकिंग आणि चेक-इन सेवांसह आमच्या काही ऑनलाइन सेवा तात्पुरत्या अनुपलब्ध असतील. यामध्ये, काम करत असताना लॅपटॉप अचानक बंद होत आहेत आणि त्यानंतर यूजर्सना निळा स्क्रीन दिसत आहे. स्क्रीनवर सांगितले जात आहे की तुमचा संगणक अडचणीत आहे आणि रीस्टार्ट करणे आवश्यक आहे. या प्रक्रियेलाच ब्लू स्क्रीन ऑफ डेथ (बीएसओडी) म्हटले जात आहे. (Microsoft Windows Crash)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.