-
ऋजुता लुकतुके
इराणने इस्त्रायलवर एकाचवेळी २०० क्षेपणास्त्रांचा मारा केल्यावर मध्य-पूर्वेतील राजकीय परिस्थिती पुन्हा एकदा बदलली आहे. एका रात्रीत कच्च्या तेलाच्या किमती ४ टक्क्यांनी वाढल्या. भारत गरजेच्या ८० टक्के तेल आयात करत असल्यामुळे वाढत्या तेल किंमतींचा मोठा परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवर होईल, अशी भीती पुन्हा एकदा व्यक्त होत आहे. तेल आणि ऊर्जेवरही भारत मध्य-पूर्वेतील देशांवर अवलंबून आहे. (Middle East Tension)
एसएस वेल्थ स्ट्रीटचे संस्थापक सुगंधा सचदेवा यांनी अलीकडेच तेलाच्या किंमती आणि भारताची स्थूल अर्थव्यवस्था यांच्यातील संबंध दाखवणारा एक लेख लिहिला आहे. त्यानुसार, तेलाच्या किमती १० टक्क्यांनी वाढल्या की, भारतातील महागाई दर ०.३ टक्क्यांनी वाढतो. तर चालू खात्यातील वित्तीय तूट १२.५ अब्ज अमेरिकन डॉलरनी वाढते. आणि हा फरक जीडीपीच्या ०.४३ टक्के इतका आहे. ‘इंधनाच्या किमती वाढल्या की, वाहतूक खर्च वाढतो. ऊर्जा निर्मितीचा खर्च वाढतो. आणि त्याचा थेट परिणाम वस्तू व सेवांच्या किमती वाढण्यात होतो,’ असं सचदेवा यांनी नमूद केलं आहे. (Middle East Tension)
(हेही वाचा- Stamp Paper: आता १०० आणि २०० रुपयांचे स्टँप पेपर इतिहासजमा होणार; राज्य सरकारचा निर्णय)
शिवाय वाढत्या किमतींमुळे भारतातून डॉलरची विक्री होते ती वेगळीच. रिलायन्स सेक्युरिटीजच्या चलन व कमोडिटी विभागाचे संशोधक जिगर त्रिवेदी यांनी हा मुद्दा मांडला. ‘तेल आयात होत असल्यामुळे त्यासाठी डॉलर खर्च करावे लागतात ते वेगळंच. त्यामुळे रुपयाचं मूल्य खालावतं. आणि त्याचाही परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर विपरित होत असतो,’ असं त्रिवेदी म्हणाले. (Middle East Tension)
इराण हा ओपेक देशांमधील एक महत्त्वाचा देश आहे. ओपक म्हणजे ऑईल प्रोड्युसिंग अँड एक्सपोर्टिंग कंट्रीज् ही तेल निर्यातदार देशांची संघटना आहे. इराणकडेही नैसर्गिक तेलाचे साठे आहेत. आणि हा देश दर दिवशी १.७ दशलक्ष बॅरल इतकं तेल निर्यात करतो. इतकंच नाही तर इराण देश हा होरमुझ खाडीच्या जवळ आहे. आणि तिथून सौदी अरेबिया, कतार आणि संयुक्त अरब अमिराती हे देश आपलं तेल पाठवतात. त्यामुळेही इंधन पुरवठा विस्कळित होण्याची शक्यता आहे. (Middle East Tension)
(हेही वाचा- Kho Kho News : राष्ट्रीय सब-ज्युनिअर खोखो स्पर्धेत महाराष्ट्राला दुहेरी सुवर्ण मुकुट )
जगातील ४० टक्के तेल पुरवठा हा ओपेक देशांकडूनच सध्या नियंत्रित होत आहे. त्यामुळे येणाऱ्या दिवसांत भारतावर त्याचा परिणाम जाणवणार हे नक्की आहे. सप्टेंबर महिन्यात भारताला थोडी जाणीवही झाली आहे. कारण, पर्चेसिंग मॅनेजर्स इंडेक्स थोडा कमी झाला आहे. तर चालू खात्याची वित्तीय तूट १.१ टक्क्यांनी वाढली आहे. देशाचा किरकोळ महागाई दर ठरवताना इंधन आणि ऊर्जेला ६.८ इतकं वेटेज देण्यात आलं आहे. त्यामुळे फक्त महागाईच नाही तर व्यापारी तूट, डॉलर विरुद्ध रुपया तसंच देशांतर्गत डॉलरसाठा कमी होणं असे परिणाम येत्या दिवसांमध्ये जाणवणार आहेत. (Middle East Tension)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community