राज्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा म्हणवा तितका परिणाम झाला नाही, आता संसर्ग ही बराच कमी झालेला आहे. अशा परिस्थितीत खुद्द राज्याचे आरोग्य मंत्र्यांनीच दिलासा दायक माहिती दिली आहे.
ओमायक्रोनचा धोका टळला
राज्यातील कोरोना मार्च महिन्याच्या मध्याला पूर्णपणे संपुष्टात येईल, अशी माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. राज्यात कोरोनाची तिसरी लाट आता ओसरत चालली आहे. ओमायक्रॉनचाही धोका आता टळलेला आहे. त्यातच आता गेल्या दोन वर्षांपासून ज्या कोरोनाच्या संकटाशी आपण लढा देत आहोत, तो मार्चच्या मध्यवधीपर्यंत संपुष्टात येऊ शकतो, अशी दिलासादायक माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
न्युकॉनबद्दल काय म्हणाले?
आरोग्य मंत्री राजेश टोपे हे पंढपूरच्या दौऱ्यावर आहे. आज त्यांनीविठ्ठलरुक्मिणीचे दर्शन घेत लता मंगेशकर यांच्या दीर्घायुष्यासाठी साकडे घातले आहे. यावेळी पत्रकारांशी बोलत असताना कोरोनाच्या परिस्थितीबद्दल माहिती दिली. तसेच कोरोनाचा न्युकॉन हा नवा व्हेरीएंट पुढे येत आहे. याबाबतच्या प्राथमिक माहितीनुसार, राज्यातील आरोग्य यंत्रणा सक्षम आहे, असेही टोपे म्हणाले
Join Our WhatsApp Community