महाराष्ट्रात सध्या कोरोना नियंत्रणाबाहेर जात आहे, त्यामुळे आरोग्य व्यवस्थेवर ताण आला आहे. म्हणून राज्य सरकारने राज्यात कडक निर्बंध लावले, मात्र तरीही गर्दी कमी होत नाही म्हणून राज्य सरकार लॉकडाऊन लावण्याच्या विचारात होते, तेव्हापासूनच राज्यभरातील परप्रांतीय मजूर हे महाराष्ट्रातून त्यांच्या राज्यात स्थलांतर करू लागले. त्या दरम्यानच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेशी संवाद साधताना राज्यांनी मजुरांना विश्वास द्यावा. त्यांना स्थलांतर न करण्यास सांगावे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. मात्र तरीही मुंबई असो कि दिल्ली परप्रांतीय मजूर स्थलांतर करत आहेत. हे मजूर पंतप्रधानांच्या आवाहनाला साद घालणार का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
६ लाख परप्रांतीय मजुरांचे स्थलांतर!
राज्यात १ एप्रिलपासून निर्बंध लागू केले आणि आता १ मेपर्यंत लॉकडाऊन लावला आहे. त्याआधीपासूनच राज्यातील परप्रांतीय मजुरांनी त्यांची मागील वर्षाप्रमाणे अडचण होऊ नये म्हणून त्यांनी त्यांच्या राज्यात परतण्यास सुरुवात केली. त्यामुळे पश्चिम रेल्वेने दिलेल्या आकडेवारीनुसार १ ते १२ एप्रिल दरम्यान १९६ ट्रेनमधून ४ लाख ३२ हजार ९६३ प्रवासी आसाम, युपी, बिहार, ओडिशा आणि पश्चिम बंगालला रवाना झाले. यापैकी १५० ट्रेनमधून ३ लाख २२ हजार ९४४ प्रवाशांनी उत्तर प्रदेश आणि बिहार गाठले आहे. उत्तर प्रदेशला जाणाऱ्या एका ट्रेनमधून २ हजार १५२ प्रवाशांनी प्रवास केला. मध्य रेल्वेवर दरराेज उत्तर आणि पूर्व भारताकरिता २८ ट्रेन चालविण्यात येत आहेत. यामध्ये १८ ट्रेन नियमित, तर १० गाड्या स्पेशल आहेत. एका ट्रेनमधून सरासरी १ हजार ४०० प्रवासी जात आहेत. गेल्या १५ दिवसांत मध्य रेल्वेवरून ३ लाख ५० हजार प्रवाशांनी मुंबई साेडली.
(हेही वाचा : कडक लॉकडाऊनमध्ये ‘हे’ करू शकणार लोकल प्रवास! )
गेल्यावर्षीच्या कटू अनुभवामुळे स्थलांतर!
वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या वर्षी केंद्र सरकारने अचानक लॉकडाऊन लावला होता. परिणामी, संपूर्ण देशाची रेल्वे वाहतूक आणि सार्वजनिक वाहतूक ठप्प करण्यात आली हाती. यामुळे लाखाे स्थलांतरित मजुरांचे अतोनात हाल झाले. अनंत यातना झेलत घरी पोहचलेले. गेल्या वर्षी संपूर्ण राज्यातून जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत ८४४ ट्रेनमधून १८ लाख श्रमिकांनी आपले गाव गाठले हाेते. यापैकी १० लाख मजुरांनी मुंबई साेडली हाेती. मात्र त्यानंतर ५ लाख मजूर पुन्हा मुंबईत आले हाेते. यातील ४ लाख मजूर उत्तर प्रदेश, बिहार आणि पश्चिम बंगालमधून आले होते. आता पुन्हा कोरोना पाठोपाठ लॉकडाऊनही आला. पण, आता तसे हाल नको म्हणून मजुरांनी पुन्हा घरचा रस्ता धरला आहे.
राज्याने परप्रांतीय मजुरांना थांबवले नाही!
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यांना त्यांच्याकडील परप्रांतीय मजुरांना त्यांच्या राज्यात जाऊ देऊ नका. १ एप्रिलपासून सर्वांना लस दिली जाणार आहेत. त्यानंतर त्यांचे कामही बंद होणार नाही, असा विश्वास परप्रांतीयांमध्ये निर्माण करा, असे म्हटले. परंतु तरीही महाराष्ट्र आणि मुंबईतून बाहेर जाणारे परप्रांतीय मजुरांना रोखण्यात आले नाही. राज्य सरकारने परप्रांतीय मजुरांना त्यांच्या राज्यात जाण्यासाठी रोखले नाही.
Join Our WhatsApp Community