हिंगोलीत वसमत, औंढा नागनाथ व कळमनुरी तालुक्यातील सुमारे ४० ते ५० गावांमध्ये रविवारी पहाटे भूकंपाचे सौम्य धक्के बसले आहेत. पहाटे साडेचार वाजता भूकंपाचा पहिला धक्का बसला. या भूकंपाची तीव्रता ३.६ रिश्टर स्केल होती. अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षातर्फे देण्यात आली आहे. तसेच नॅशनल सेंटर फॉर सिसमोलॉजीतर्फे सुद्धा या भूकंपाची तीव्रता ३.६ रिश्टर स्केल आहे असे सांगण्यात आले आहे.
( हेही वाचा : ‘बायकोच्या हस्तक्षेपामुळे उद्धव ठाकरेंचे मुख्यमंत्रीपद गेले’ मनसेच्या प्रकाश महाजनांचे टीकास्त्र)
या गावात जाणवले भूकंपाचे धक्के
हिंगोलीत विशेषत: वसमत, कळणनुरी व औंढा नागनाथ तालुक्यात मागील ८ ते १० वर्षांपासून जमिनीतून आवाज येण्याचे प्रकार होत आहेत. भूगर्भातील सूक्ष्म हालचालींमुळे हे आवाज येत असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. औंढा नागनाथ तालुक्यातील पिंपळदरी, राजदरी, सोनवाडी, आमदारी, कंजारा, पुर, वसई, जामगव्हाण, जलालदाभा, काकडदाभा, वसमत तालुक्यातील पांगरा शिदे, वापटी, कळमनुरी तालुक्यातील बोथी, दांडेगाव, सिंदगी, बोल्डा, असोला आदी गावांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले.