सातारा जिल्ह्यातील कोयना धरण क्षेत्रात मंगळवारी, २० एप्रिल रोजी दुपारी तीन वाजताच्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले. यामुळे काही काळ परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. या भूकंपाचे धक्के कोयना धरण परिसरातील गावांनाही बसले.
कोणतीही जीवित आणि वित्त हानी झाली!
कोयना धरण क्षेत्रात दुपारी ठीक 3.22 मिनिटांनी पहिला भूकंपाच्या धक्का 3.02 रिश्टर स्केल इतका होता. तर दुसरा भूकंपाचा धक्का ठीक 3.44 मिनिटांनी 3.00 रिश्टर स्केल इतका नोंदवण्यात आला होता. या भूंकपाचा केंद्रबिंदू वारणा खोऱ्यातील किकली या गावाच्या सात किलोमीटरअंतरच्या पूर्वेला होता, अशी माहिती कार्यकारी अभियंता वैभव फाळके यांनी दिली आहे. दरम्यान यामुळे कोणतीही जीवित आणि वित्त हानी झाली नाही. दरम्यान कोयना धरण क्षेत्रात कायम भूकंपाचे धक्के बसत असतात. त्यांचा धरणावर परिणाम होऊ नये म्हणून कायम या धरणाचे स्ट्रक्चरल ऑडिट केले जाते. तसेच कायम धरण क्षेत्राची पाहणी केली जाते. कोयना धरणातून राज्याला वीज पुरवठा केला जातो, त्यामुळे या धरणाच्या सुरक्षिततेच्या विषयाला प्राधान्य दिले जाते.
(हेही वाचा : राज्यात 15 दिवसांचा कडक लॉकडाऊन… मुख्यमंत्री करणार घोषणा!)
काय आहे कोयना धरण क्षेत्रातील भूकंपाचा इतिहास?
कोयना धरणाने बऱ्याच भूकंपांच्या धक्क्यांना तोंड दिले आहे. त्यात 1967 साली झालेला भूकंप सर्वात मोठा होता. त्या भूकंपामुळे धरणाला काही भेगाही पडल्या. त्यानंतर बुजवण्यात आल्या. शिवाय, धरणाच्या अंतर्गत भागात बोअरने छिद्रे पाडून हायड्रोस्टॅटिक प्रेशर कमी करण्याचाही प्रयत्न करण्यात आला आहे. धरणाच्या बाजूला एक अतिखोल बोअर घेऊन भूकंपाच्या हालचाली मोजण्याचाही प्रयत्न झाला. त्यामुळे संभाव्य भूकंपांची शक्यता तपासता येणार आहे. ते बोअर जवळपास सात किलोमीटर खोलीचे आहे. भारतीय शास्त्रज्ञांच्या मदतीने ते जागतिक धर्तीचे काम करण्यात आले आहे. धरणाचे सशक्तीकरण 1973 व 2006 साली असे दोन वेळा करण्यात आले. त्यामुळे भविष्यात पुन्हा, 1967 साली झालेल्या भूकंपाइतका भूकंप होऊनही त्याचा धरणाला धोका पोचणार नाही, असा विश्वास तज्ज्ञांना आहे.
Join Our WhatsApp Community