देशभरासह राज्यात मागील अनेक दिवसांपासून थंडीचा जोर चांगलाच वाढला आहे. लागोपाठ दुसऱ्या दिवशी शहराच्या किमान तापमान १ ते २ अंशानी घट झाल्याने शहरात चांगलाच गारठा जाणवू लागला आहे. राजाधानी दिल्लीत कडक्याची थंडी सुरू झाली आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पुढील २४ तासात दक्षिणेकडील तामिळनाडू आणि केरळमध्ये पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. याशिवाय लडाख, हिमाचल प्रदेश येथे हलक्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तर हिमाचल प्रदेशातील अनेक भागात बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे. (weather Update)
रविवारी (१७ डिसेंबर) दिल्लीत कमाल तापमान २५ अंश तर किमान तापमान ७ अंश राहण्याचा अंदाज आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार.२१ डिसेंबर पर्यंत किमान तापमान ५ अंश आणि कमाल तापमान २३ अंश असू शकते. तर महाराष्ट्रात कोकण मध्ये थंडीची हलकी चाहूल सुरू झाली आहे. सध्या कोकण किनारपट्टी भागात काही दिवसांपासून ढगाळ हवामान असून वातावरणात सतत चढ-उतार होत आहे. त्यामुळे नागरिकांना दिवसा मात्र उकाडा कायम आहे आणि पहाटे गारवा असे संमिश्र स्वरूपाचे वातावरण अनुभवायला मिळत आहे. (weather Update)
(हेही वाचा : JN.1 case : कोरोनामुळे एका रुग्णाचा मृत्यू ; केरळ अलर्ट मोडवर)
आंबा मोहोरासाठी थंडी पोषक
आंबा मोहोराची प्रक्रिया सध्या सुरू आहे. फवारणीचे काम आंबा बागायतदारांकडून सुरू आहे. या फवारणीला थंडीची जोड मिळावी अशी अपेक्षा आंबा बागायतदारांची आहे. त्यामुळे आंबा बागायतदार सुखावले आहेत.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community