
गुरुवार, 26 डिसेंबर 2024 ला महाराष्ट्र मिलिटरी स्कूल, मुरबाड येथे “Guest of the Month” या कार्यक्रमांतर्गत इतिहास अभ्यासक आणि भारतीय प्रशासकीय सेवा अभ्यासिकेचे (IAS Study Circle) चे संचालक प्रा. महेश कुलकर्णी यांचे विद्यार्थ्यांसाठी “भारतीय स्वातंत्र्याचा इतिहास आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे योगदान” या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. (Military School)
(हेही वाचा – Baba Siddique Murder : लवकरच २६ आरोपींविरुद्ध दाखल होणार आरोपपत्र)
या कार्यक्रमाची सुरुवात स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुतळ्यास पुष्पहार आणि पुष्पचक्र अर्पण करुन करण्यात आली. शाळेचे प्राचार्य काशीनाथ भोईर यांनी प्रा. महेश कुलकर्णी यांचे शाळेच्या वतीने सन्मान चिन्ह देऊन स्वागत करण्यात आले. या याप्रसंगी शाळेचे प्राचार्य काशिनाथ भोईर यांनी आपल्या प्रस्ताविकातून “Guest of the Month” या शाळेच्या उपक्रमाबाबतचा हेतू स्पष्ट केला आणि सदर उपक्रमाची गरज याविषयी सांगितले. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रा. महेश कुलकर्णी यांनी भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास आणि भारतीयांचा स्वातंत्र्यासाठीचा संघर्ष याविषयी अनेक उदाहरणे आणि प्रसंग सांगून विद्यार्थ्यांना अवगत केले. आपल्या व्याख्यानात प्रा. कुलकर्णी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर, नेताजी सुभाषचंद्र बोस, लाला हरदयाल यांचा गौरवपूर्ण उल्लेख केला. (Military School)
(हेही वाचा – Sambhal मध्ये जामा मशिदीसमोर वैदिक मंत्रोच्चाराने झाले पोलीस चौकीचे भूमिपूजन)
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल बोलताना प्रा. कुलकर्णी म्हणाले की, स्वातंत्र्यवीर सावरकर युगपुरुष होते. भारतीय स्वातंत्र्य लढ्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. स्वातंत्र्य मिळवण्यासाठी सावरकरांनी अतुल्य आणि अत्युच्च कोटीचा संघर्ष आणि हाल अपेष्टा भोगल्या. स्वातंत्र्यवीर सावरकर एक अष्टपैलू व्यक्ती होते. भारतीय स्वातंत्र्यलढ्यात त्यांच्या योगदानाबद्दल तुलना करता येणार नाही. सावरकरांच्या सैनिकी शिक्षणाच्या विचाराबद्दल विद्यार्थ्यांना त्यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांनी सैन्यात जाण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. त्यासाठी स्पर्धा परीक्षा देऊन सैन्यात भरती होण्यासाठी स्वतः ला सिद्ध केले पाहिजे. विद्यार्थ्यांमधील स्वयंशिस्तीचे आणि संशोधक वृत्तीचे त्यांनी कौतुक केले. यांनी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली. प्रश्नोत्तराच्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांचा उत्साह आणि प्रतिसाद उत्तम होता. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रमोद देसले यांनी केले. राज्यगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. (Military School)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community