Military Voluntary Retirement : केंद्र सरकारची राज्यसभेत धक्कादायक माहिती; ५५ हजार जवानांची ‘स्वेच्छानिवृत्ती’

89

गृह राज्यमंत्री नित्यानंद राय (Nithyananda Rai) यांनी राज्यसभेत खासदार मुकुल वासनिक (MP Mukul Wasnik) यांना दिलेल्या लेखी उत्तरात सांगितले की, राष्ट्रीय सुरक्षा गार्ड (NSG), केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (CRPF) आणि आसाम रायफलचे (Assam Rifles) ५५ हजार ५५५ जवान सेवेतून मुक्त झाले आहेत. यातील ४७,८९१ जवानांनी स्वेच्छानिवृत्ती (Military Voluntary Retirement) घेतली आहे. ७,६६४ जवानांनी राजीनामा दिला आहे, तर ७३० जवानांनी आत्महत्या केली आहे. (Military Voluntary Retirement)

मागील पाच वर्षांत राष्ट्रीय सुरक्षा गार्डसह निमलष्करी दलातील (paramilitary forces) ५५ हजार ५५५ जवानांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे. तर, ७३० जवानांनी आत्महत्या केली आहे. आकडेवारीनुसार, २०२० मध्ये ७,६८४ जवानांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली आणि राजीनामे दिले आहेत. २०२१ मध्ये १२,०१३ आणि २०२२ मध्ये १२,३७१ जवान सेवेतून मुक्त झालेत. मागील पाच वर्षांमध्ये सर्वाधिक नोकरी सोडण्याच्या घटना २०२३ मध्ये घडल्या. या वर्षी १२,३०२ जवानांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे.

(हेही वाचा – बालकांवरील लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत (Pocso Act) ३५ प्रकरणांवर सुनावणी)

जवानांची आत्महत्या किती?
निमलष्करी दलात आत्महत्या करण्याच्या सर्वाधिक घटना २०२१ आणि २०२३ मध्ये घडल्या. दोन्ही वर्षांत प्रत्येकी १५७ जवानांनी आत्महत्या केली आहे.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.