सध्या खाद्य पदार्थांत भेसळ करण्याचे प्रमाण वाढले आहे. अन्न पदार्थांत भेसळ करण्यात येणा-या पदार्थांमध्ये दूध आणि दुग्धजन्य पदार्थांत भेसळ करण्याचे प्रमाण अधिक आहे. आता दुधाचा भेसळ करण्याचा असाच एक प्रकार उघडकीस आला आहे. नामांकित कंपन्यांच्या दुधात भेसळ करणाऱ्या टोळीचा मुंबई पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. मुंबई क्राईम ब्रांचने गोरेगाव परिसरात छापा टाकून ही कारवाई केली आहे. नामांकीत दूधाच्या पिशवीत अस्वच्छ पाण्याची भेसळ होत होती आणि ते दूध हाॅटेल तसेच टपरीवर विकले जात होते. पोलिसांनी घटनास्थळावर कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतले.
अशी करत होते भेसळ!
मुंबई पोलिसांनी घटनास्थळी छापा टाकला, त्यावेळी दूध भेसळ करणाऱ्यांना रंगेहाथ पकडले. या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. ही टोळी नामांकित दुधाच्या पिशवीतून दूध काढते आणि त्यानंतर सीरिंजच्या मदतीने त्यात अस्वच्छ पाणी भरताना या व्हिडिओत दिसत आहे.
नामांकित कंपनीच्या दुधात अस्वच्छ पाण्याची भेसळ करुन केली जात होती विक्री. पोलिसांनी रंगेहाथ पकडले.@Amul_Coop @amulcares @DGPMaharashtra @MumbaiPolice @amulcares pic.twitter.com/DcSh3sW3HR
— Hindusthan Post Marathi (@HindusthanPostM) December 9, 2021
हॉटेल आणि चहाच्या टपरीवर विक्री
कांदिवली गुन्हे शाखेच्या युनिट 11 ला या दूध भेसळ कऱणाऱ्या रॅकेटबाबत माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी गोरेगाव येथे छापा टाकला. यावेळी या दूध भेसळ करणाऱ्या टोळीला पकडण्यात आले. ही टोळी नामांकित कंपनीच्या दुधात दुषित पाणी मिसळून ते दूध हॉटेल आणि चहाच्या टपरीवर विक्री करत होती. पोलिसांनी घटनास्थळावरुन एका व्यक्तीला अटक केली आहे. ज्याचे नाव सैदुल बाकया कम्मापती असे आहे. पोलिसांनी घटनास्थळावरुन 125 लीटर भेसळयुक्त दुधाचा साठाही जप्त केला आहे.
( हेही वाचा :आनंदाची बातमी! देशातील ५ वर्षांखालील बालकांचे सुधारते आरोग्य )
Join Our WhatsApp Community