गृहिणींचे बजेट कोलमडले! गायीचे दूध प्रतिलिटर ३ रुपयांनी महागले

175

वाढत्या महागाईमुळे मुंबईकर त्रस्त झाले आहेत. अशातच आता पुन्हा एकदा दुधाच्या दरात वाढ करण्यात आली आहे. कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने गोकुळ दूध दरात पुन्हा एकदा वाढ केली आहे. गोकूळ दुधामध्ये ३ रुपयांची वाढ करण्यात आली असून अर्धा लिटरमागे २ रुपये वाढवले आहेत. त्यामुळे गोकूळचे दूध प्रतिलिटर ५४ रुपये झाले आहे. ही दरवाढ ६ डिसेंबरपासून लागू करण्यात आली आहे. याचा फायदा दूध उत्पादक शेतकऱ्यांना होणार आहे. मात्र या दरवाढीमुळे गृहिणींचे बजेट कोलमडणार आहे.

( हेही वाचा : ५ हजारापर्यंत गुंतवणूक करून सुरू करा व्यवसाय! सरकारही करेल मदत, काय आहे ही योजना?)

विक्री दरात प्रतिलिटर ३ रुपयांची वाढ

गोकुळकडून ही दरवाढ मुंबई, नवी मुंबई, ठाणे, रायगड या जिल्ह्यांमध्ये करण्यात आली आहे. गोकुळच्या फुल क्रिम दुधाच्या दरात बदल करण्यात आलेला नाही. गोकुळ दूध संघाने गायीच्या दूध दरात मागच्या ३ महिन्यांत दुसऱ्यांदा वाढ केली आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये देशात दुधाची टंचाई भासू लागली होती त्यामुळे राज्यातील जवळपास सर्वच सहकारी आणि खासगी दूध संघांनी गाय आणि म्हैस दूध खरेदी दरात वाढ केली होती. जुन्या दराने विक्री करणे तोट्याचं ठरत असल्यामुळे संचालक मंडळाने सोमवारी मध्यरात्री बारापासून विक्री दरात प्रतिलिटर ३ रुपयांची वाढ केली आहे तर अर्धा लिटरमागे अतिरिक्त २ रुपये मोजावे लागतील. हे नवे दर ६ डिसेंबरपासून लागू झालेले आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.