२०२२ हे वर्ष संपायला आता फक्त काही दिवस बाकी राहिले आहेत. नव्या वर्षापूर्वीच सर्वसामान्य नागरिकांना आणखी एक झटका बसणा आहे. कारण पुन्हा एकदा दुधाच्या दरात वाढ करण्याचा निर्णय मदर डेअरीने घेतला आहे. मंगळवारपासून ही दरवाढ करण्यात येणार असून भाव २ रुपयांनी वाढवण्यात येणार आहेत.
( हेही वाचा : ITI विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! ४० रुपयांऐवजी ५०० रुपये विद्यावेतन देणार )
दुधाच्या दरात ५ वेळा वाढ
मदर डेअरीने उत्पादन खर्चात वाढ झाल्यामुळे दिल्ली – एनसीआर बाजारात दुधाच्या दरात २ रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. मदर डेअरी दिल्ली एनसीआरमध्ये दररोज ३० लाख लीटर दूध पुरवते.
मदर डेअरीने फुल क्रिम दुधाच्या दरात प्रतिलिटर २ रुपयांनी वाढ केली आहे. तर टोन्ड दूध ५१ रुपयांवरून ५३ रुपये प्रतिलिटर करण्यात आले आहे. गाईच्या दूधात मदर डेअरीने वाढ केलेली नाही. मदर डेअरीने गेल्याच महिन्यात दुधाचे दर वाढवले होते, यावर्षी दुधाच्या दरात ५ वेळा वाढ करण्यात आली आहे.
Join Our WhatsApp Community