पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्याच्या कळंब गावच्या हद्दीत पुणे नाशिक महामार्गावर बायपास रस्त्यावर दुधाच्या टँकरने पेट घेतलल्याची घटना दिनांक 16 रोजी सकाळच्या सुमारास घडली आहे. (Milk Tanker Fire) या आगीत टँकरची केबिन पूर्णपणे जळून खाक झाले असून तर स्थानिक तरुणांनी टँकरमधील दुधानेच आग विझवली असून सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही. (Milk Tanker Fire)
(हेही वाचा – Navi Mumbai Metro : नवी मुंबईकरांसाठी मोठी बातमी; आता मेट्रोतून आरामदायी प्रवास)
मिळालेल्या माहितीनुसार, आज गुरुवार दि 16 रोजी पुणे नाशिक महामार्गावरील कळंब गावच्या हद्दीतील बायपास येथे एम एच 15 जी व्ही हा टँकर घेउन चालक दामोदर क्षीरसागर हे पुण्याहून संगमनेर येथे जात होते.
मागून येणाऱ्या चारचाकी वाहन चालकाने क्षीरसागर यांना सांगितले की वाहनाला आग लागली असून धूर निघत आहे. कळंब बायपास जवळ दुधाच्या टँकरचे केबिनमध्ये शॉर्टसर्किट होऊन अचानक आग लागल्याचे चालकाच्या लक्षात आल्याने त्यांनी प्रसंगावधान राखून सदर गाडी रस्त्याच्या कडेला उभी केली. (Milk Tanker Fire)
(हेही वाचा – Navi Mumbai Metro : नवी मुंबईकरांसाठी मोठी बातमी; आता मेट्रोतून आरामदायी प्रवास)
चालकाने मदतीसाठी समोर शेतात असलेले देवराम कानडे व त्यांचा मुलगा तेजस कानडे यांच्याकडे बादल्यांची मागणी केली. त्यांनी व तेथे असलेल्या तरुणांच्या साहाय्याने वाहनातील दुधाच्या साह्याने टँकर विझविण्याचा प्रयत्न केला त्याचबरोबर वाहनात असलेल्या अग्नीविरोधकाच्या साहाय्याने देखील आग विझविण्याचा प्रयत्न केला. ही माहिती कळताच अंकुश शेवाळे व अभिजीत थोरात हे अग्निरोधक घेऊन आले. त्यांनीसुद्धा आग विझविण्याचा प्रयत्न केला.
सुदैवाने तरुणांनी मदत केल्यामुळे आग डिझेल टाकीपर्यंत पोहचू शकली नाही. त्यामुळे त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.
दुधाच्या टँकरचे संपूर्ण केबिन पूर्णपणे जळून खाक झाले हा दुधाचा टँकर मंचर बाजू कडून नारायणगाव बाजूकडे जात होता हॉटेल इंद्राच्या समोरील बाजूला जाताना शेतकरी देवराम विठ्ठल कानडे यांच्या शेतासमोरच टॅंकरने पेट घेतला होता. (Milk Tanker Fire)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community