मुंबईतील बंद पडलेल्या ५८ गिरण्यांमधील गिरणी कामगारांना (Mill Workers) सदनिका देण्याचा निर्णय सोमवार, ११ मार्च रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. त्यावेळी बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. या घरांसाठी सुमारे 1500 कोटी रुपये बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निधीतून उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
सदनिका (Mill Workers)बांधण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजना शहरी अंतर्गत संयुक्त भागीदारीद्धारे घराची निर्मिती करण्यात येईल. यासाठी महाहाऊसिंगच्या कार्यकक्षेचा विस्तारही करण्यात येईल. ही घरे बांधण्याकरिता अनुदानापोटी 3 हजार कोटी इतकी रक्कम गृहनिर्माण विभागास तत्काळ उपलब्ध करून देण्यात येईल. एक तृतियांश म्हणजेच 1000 कोटी रुपये रक्कम अर्थसंकल्पीय तरतुदीतून उपलब्ध करून द्यावयाची असल्याने स्वतंत्र लेखाशिर्षातून ही रक्कम उपलब्ध करून देण्यात येईल. उर्वरित महाराष्ट्र निवारा निधीतून देण्यात येईल.
(हेही वाचा CAA ला विरोध का ? काय आहे वास्तविकता ?)
अयोध्येत महाराष्ट्र भवनासाठी ६७ कोटींचा भूखंड
उत्तर प्रदेशमधील अयोध्या येथे महाराष्ट्र भवनासाठी भूखंड उपलब्ध करून घेण्यास सोमवारच्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. हा भूखंड 9420.55 चौ. मीटर एवढा असून याची किंमत 67 कोटी 14 लाख इतकी आहे. हा भूखंड उत्तर प्रदेश आवास व विकास परिषदेमार्फत सेक्टर 8 डी, भूमी विकास गृहस्थान एवं बाजार योजना, शहानवाजपूर माझा येथे आहे. या ठिकाणी महाराष्ट्र भवनाचे बांधकाम झाल्यावर महाराष्ट्रातील भाविकांना प्रभू श्रीरामाचे दर्शन घेणे सोईचे आणि आरामदायी होईल तसेच त्यांची माफक रकमेत निवासाचीही व्यवस्था होईल.
Join Our WhatsApp Community