गिरणी कामगारांना पालिकेने घरासाठी भूखंड देण्याचा महत्वाचा निर्णय घेतला आहे. म्हाडाच्या वाटेला आलेले, विखुरलेल्या लहान भूखंडांच्या बदल्यात पालिकेने स्वत:कडील मोठा भूखंड देण्याचा निर्णय घेतला आहे.
भूखंड पालिकेला दिला
गिरण्याच्या जमिनी विकल्यावर, त्याची वाटणी केली जाते. त्यात म्हाडाच्या वाट्याला 27 ते 33 टक्के भूखंड हा खरेदीदाराला मिळतो. दक्षिण- मध्य मुंबईतील सहा गिरण्यांच्या जमिनीचा प्रत्येकी 27 टक्के वाटा म्हाडाला गिरणी कामगारांची घरे बांधण्यासाठी मिळाले होते. या सहा भूखंडाचे एकत्रित क्षेत्रफळ 3, 873.83 चौरस मीटर आहे, तर पालिकेला शिवडी येथील एमएसटीसी मिलचा परळ शिवडी डिवीजन येथील 3,607.83 चौरस मीटरचा भूखंड पालिकेने म्हाडाला दिला आहे, तर त्या बदल्यात विखुरलेले लहान भूखंड म्हाडाने पालिकेला दिले आहेत.
( हेही वाचा: संपकरी एसटी कामगार विलीनीकरणासाठी आग्रहीच! आता घेतली ‘ही’ भूमिका? )
घरे बांधण्यासाठी मार्ग मोकळा
पालिकेच्या ताब्यातील शिवडीतील हा भूखंड मनोरंजन मैदानासाठी राखीव आहे. त्या भूखंडाचे आरक्षण बदलून तो निवासी पट्ट्यात समाविष्ट करण्यात येणार आहे. तसा प्रस्ताव प्रशासनाकडून महासभेत मांडण्यात आला. या भूंडखंडावर गिरणी कामगारांसाठी घरे बांधण्यासाठी मार्ग मोकळा होऊ शकतो.
‘हे’ भूखंड पालिकेला मिळणार
मोठ्या भूखंडाच्या बदल्यात पालिकेला काळाचौकी येथील एमएसटीसी मिलचा 1,9.83 चौरस मीटर, काळाचौकी येथील मफतलाल मिलचा 481.43 चौरस मीटरचा भूखंड, लोअर परळ येथील मातुल्य मिलचा 388.30 चौरस मीटरचा भूखंड, सात रस्ता येथील हिंदुस्थान मिलचा 542.10 चौरस मीटरचा भूखंड परळ येथील व्हिक्टोरिया मिलचा 850 चौरस आणि माहीम येथील 602.17 चौरस मीटरचा भूखंड असे 3,833.83 चौरस मीटरचे भूखंड पालिकेला देण्यात येणार आहेत.
Join Our WhatsApp Community