मुंबईत मिलेट्स फूड फेस्टिव्हल : भरड धान्याच्या स्वादिष्ट खाद्यपदार्थांचा आस्वाद घेता येणार

85

शांघाय सहकार्य संघटनेच्या देशांमध्ये संस्कृती आणि परंपरांचे वैविध्यपूर्ण मिश्रण आहे आणि ते त्यांच्या पाककृतींमध्येही दिसून येते. त्यामुळे शांघाय सहकार्य संघटना भरड धान्य महोत्सवाच्या माध्यमातून येत्या 6 दिवसांत मुंबईकरांना भरड धान्याचे महत्व जाणून घेता येईल आणि दक्षिण आशियाई, मध्य आशियाई आणि रशियन खाद्यपदार्थांच्या भरड धान्यावर आधारीत विविध स्वादिष्ट पाककृतींचा आस्वाद घेता येईल, असे केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद येसू नाईक यांनी म्हटले आहे.

2023 या वर्षासाठी शांघाय को-ऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) अर्थात शांघाय सहकार्य संघटनेच्या भारताच्या अध्यक्षपदा अंतर्गत केंद्रीय पर्यटन मंत्रालयाने मुंबईत ताजमहाल पॅलेस हॉटेल इथे 13 ते 19 एप्रिल 2023 या कालावधीत ‘मिलेट्स फूड फेस्टिव्हल’या चौथ्या आणि शेवटच्या टप्प्यातील पर्यटन भरड धान्य खाद्य महोत्सवाचे आयोजन केले आहे. या महोत्सवाचे उद्घाटन 13 एप्रिल 2023 रोजी ताजमहाल पॅलेस, मुंबई इथे केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद येसू नाईक यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते.

(हेही वाचा अमित शाहांची भविष्यवाणी; २०२५च्या आधीच देशातील ‘या’ राज्यातील सरकार कोसळणार)

शतकानुशतके भरड धान्य हा आपल्या आहाराचा अविभाज्य भाग राहिला आहे. आरोग्य विषयक मुबलक फायद्यांसोबतच, भरड धान्यांना जमिनीत पाणी आणि इतर पूरक घटक कमी प्रमाणात लागत असल्यामुळे, भरड धान्य पर्यावरणपूरकही आहेत आणि त्‍यांच्या सेवनाने संयुक्‍त राष्‍ट्रांनी ठरवून दिलेली शाश्‍वत विकासाची किमान सहा अनिवार्य उद्दिष्टे पूर्ण करण्‍यात, जगाला मदत होऊ शकते, अशी माहिती नाईक यांनी यावेळी दिली. म्हणूनच भरडधान्यांचे उत्पादन आणि वापर वाढवून जागरूकता निर्माण करण्यासाठी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने मांडलेला प्रस्ताव मान्य करुन संयुक्त राष्ट्रांनी 2023 हे आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष म्हणून घोषित केले असे त्यांनी यावेळी सांगितले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.