संपूर्ण जगभरात नोकरकपात सुरू असतानाच दिलासादायक बातमी समोर आली आहे. त्यानुसार आगामी 7 वर्षात इलेक्ट्रिक वाहन उद्योगात कोट्यवधी नोकऱ्या निर्माण होणार आहेत. देशातील इलेक्ट्रिकल व्हेहीकल विक्रीचा आकडा 2022 मध्ये 10 लाखांवर पोहोचला आहे. हे प्रमाण 2021 च्या तुलनेत तिप्पट आहे.
( हेही वाचा : Ind vs Aus : जाडेजा-अश्विनची कमाल गोलंदाजी! ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव आटोपला)
ईव्ही सेक्टर देशातील नोकऱ्यांचे प्रमुख स्त्रोत बनणार
नुकत्याच झालेल्या आर्थिक सर्वेक्षणात, सरकारने सन २०२३ पर्यंत देशातील इलेक्ट्रिक वाहनांची संख्या एक कोटींचा आकडा पार करेल, तसेच त्याच्याशी संबंधित प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष नोकऱ्यांची संख्या देखील 5 कोटींहून जास्त असेल, असा अंदाज व्यक्त केला होता. ईव्ही आणि हायरिंग सेक्टरशी संबंधित तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की ईव्ही सेक्टर देशातील नोकऱ्यांचे प्रमुख स्त्रोत बनू शकते.
सरकारचा प्रयत्न आहे की 2030 पर्यंत एकूण वाहन विक्रीमध्ये ईव्हीचा वाटा 30 टक्के असावा. वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे मूळ उपकरणे उत्पादक आणि घटक कंपन्यांची एक एकोसिस्टिम तयार होईल. यामध्ये केमिकल सायंटिस्ट, मटेरियल इंजिनियर, डिझाईन इंजिनियर, डेव्हलपमेंट इंजिनियर, इलेक्ट्रिकल इंजिनियर, कमर्शियल डिझायनर, सॉफ्टवेयर डेव्हलपर, सॉफ्टवेयर इंजिनियर, मशिन लर्निंग, एआय, मॅन्युफॅक्चरिंग, इक्विपमेंट असेम्बलर, मशिन टूल ऑपरेटर, मेंटनन्स मेकॅनिक, टेक्निशियन, इन्फ्रास्ट्रक्चर इलेक्ट्रिशियन, पॉवरलाईन इन्स्टॉलर याचा समावेश आहे. भारतात 10 वर्षांत ईव्ही उद्योग 80.71 टक्के दराने वाढला आहे. भारतात 2013 मध्ये फक्त 2,693 इलेक्ट्रिक वाहनांची विक्री झाली होती. तर 2022 मध्ये हा आकडा 9,99,949 पर्यंत वाढला. म्हणजेच इलेक्ट्रिक वाहनांची विक्री सरासरी वार्षिक विक्री तब्बल 80.71 टक्के दराने वाढली.
Join Our WhatsApp Community