कोविड लसीकरणाची दशकोटींची मोहीम फत्ते

139

कोविड लसीकरणात राज्याने आतापर्यंत १० कोटींचा टप्पा यशस्वीरित्या पार केल्याची माहिती आरोग्य विभागाचे सचिव प्रदीप व्यास यांनी दिली. लसीकरण मोहिम यशस्वीरित्या राबवण्याचे श्रेय हे स्थानिक जिल्हाधिका-यांना व्यास यांनी दिले. मंगळवारी सायंकाळपर्यंत ४ लाख ७ हजार ८७५ जणांचे लसीकरण पार पडले. तर एकूण १० कोटी ६५ हजार २३७ लोकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे.

आतापर्यंत ६ कोटी ८० लाख २८ हजार १६४ लोकांना लसीकरणाचा पहिला डोस मिळाला तर ३ कोटी २० लाख ३७ हजार ७३ लोकांनी दुसरा लसीकरणा डोस घेतल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. या संपूर्ण यशस्वी लसीकरण मोहिम राज्यातील आरोग्य विभागासह संलग्न संबंधित पालिका अधिकारी तसेच आरोग्याबाबत जनजागृती करणा-या स्वयंसेवी संस्थानाही द्यायला हवे, असे मत आरोग्य क्षेत्रातून व्यक्त करण्यात आले.

(हेही वाचा – पगाराच्या आंदोलनात ‘नोकरी’ही गेली; राज्यात ‘या’ आगारातील ३७६ कर्मचारी निलंबित)

सध्या राज्यातील दर दिवसाची नव्या कोरोनाबाधिक रुग्णांची संख्या हजारांच्या खाली नोंदवली जात आहे. मात्र सणोत्सवारानंतर ही संख्या वाढण्याचीही भीती असते. दिवाळीनिमित्ताने बहुतेकजण नातेवाईकांच्या भेटीला, बाहेरगावी जाऊन आलेत, त्यांचे लसीकरण पूर्ण झाले की नाही याकडेही लक्ष द्यायला हवे, असेही मत वैद्यकीय क्षेत्रातून व्यक्त होत आहे.

राज्यात ९८२ नवीन रुग्णांचे निदान

राज्यात मंगळवारी ९८२ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ६६,१९,३२९ झाली आहे. आज १,२९३ रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात आजपर्यंत एकूण ६४,६१,९५६ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेल्याचे सांगण्यात आले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९७.६२% एवढे झाले आहे.

मुंबईत दिवसभरात २७४ नवे रुग्ण

मुंबईत दिवसभरात २७४ नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली. आता पर्यंत बाधित रुग्णांची संख्या ७५८९४७ एवढी झाली आहे. तर १ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू नोंदविण्यात आल्याने आज आता पर्यंत १६२८२ मृत्यूची नोंद करण्यात आली. महाराष्ट्राने आज दहा कोटी नागरिकांचे लसीकरण पूर्ण करण्याचा टप्पा गाठला. प्रत्येक जिल्ह्यात काम करणारे सर्व अधिकारी कर्मचा-यांच्या अथक परिश्रमातून हे यश साध्य झाले. असे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.