जम्मू काश्मीरच्या (Jammu Kashmir) राजौरीमधील (Rajouri) नौशेरा सेक्टरमध्ये दि. १४ जानेवारी रोजी नियंत्रण रेषेजवळ झालेल्या सुरुंग स्फोटात सहा लष्करी जवान जखमी झआले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नियमित गस्त घालत असताना, लष्कराच्या एका पथकाचे चुकून एका भूसुरुंगावर पाऊल पडले, ज्यामुळे हा स्फोट झाला. या घटनेत सहा लष्करी जवान जखमी झाले आणि त्यांना तातडीने उपचारासाठी राजौरी येथील १५० जनरल हॉस्पिटल (GH) मध्ये दाखल करण्यात आले.
( हेही वाचा : Sambhal Violence प्रकरणी आतापर्यंत ६० आरोपींवर कारवाई)
मिळालेल्या माहितीनुसार, गोरखा रायफल्सचे (Gorkha Rifles) जवान सकाळी १०.४५ वाजता राजौरीतील खांबा किल्ल्याजवळ नियमित गस्त घालत असताना हा स्फोट झाला. जखमी जवानांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांना किरकोळ दुखापत झाल्याची माहिती मिळत आहे.
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community