BMC : तीन वर्षांपूर्वी २१ लाख रुपयांत खरेदी केलेल्या मिनी कॉम्पॅक्टरसाठी महापालिका आता मोजणार ४५ लाख

791
BMC : पूर्व मुक्त मार्गावरून थेट ग्रँटरोडला पोहोचणाऱ्या पुलाच्या बांधकामाला ब्रेक?
  • सचिन धानजी, मुंबई

मुंबई महापालिकेच्या (BMC) घनकचरा विभागाच्यावतीने आता मिनी कॉम्पॅक्टर्सची खरेदी केली जाणार आहे. ३८ कॉम्पॅक्टर हे कालबाह्य झाले असून वाहन चालकांच्या कमतरतेमुळे तसेच त्यांच्या रिक्त पदांमुळे केवळ ३० कॉम्पॅक्टर्सची खरेदी केली जाणार आहे. मात्र, एका मिनी कॉम्पॅक्टरच्या सांगडा खरेदीसाठी सुमारे २४ लाख रुपये आणि सांगाड्यावर अतिरिक्त बांधणीसाठी सुमारे २१ लाख रुपये आणि त्यावर पुढील सात वर्षांच्या देखभालीसाठी २७ लाख रुपये खर्च केले जाणार आहे. त्यामुळे एका मिनी कॉम्पॅक्टरसाठी सुमारे ४५ लाख रुपये आणि देखभालीसाठी २७ लाख रुपये अशाप्रकारे एकूण ७२ लाख रुपये खर्च केले जाणार आहे. तर मागील वर्षी केवळ २८.७१ लाख रुपयांमध्ये मिनी कॉम्पॅक्टर्सची खरेदी करण्यात आली होती. (BMC)

मुंबईत दरदिवशी ६५०० मेट्रिक टन कचरा निर्माण होत असून हा सर्व कचरा महापालिकेच्या मालकीच्या तसेच खासगी संस्थांच्या भाडेतत्वावरील वाहनांद्वारे जमा करून त्यांची विल्हेवाट डम्पिंग ग्राऊंडवर लावला जातो. मुंबईतील विविध भागांमध्ये जमा करण्यात आलेला कचरा हा लार्ज कॉम्पॅक्टर, मिनी कॉम्पॅक्टर आणि स्टेशनरी कॉम्पॅक्टरद्वारे या विविध ठिकाणच्या कचरा हस्तांतरण केंद्रांवर तसेच कांजूरमार्ग येथील डम्पिंग ग्राऊंडवर नेऊन रिकामा केला जातो. घरोघरी निर्माण होणारा तसेच सामुहिक कचरा पेट्यांमधील कचरा हा मिनी कॉम्पॅक्टरद्वारे जमा करून वाहून नेला जातो. मिनी कॉम्पॅक्टर एका पाळीमध्ये दोन फेऱ्या करतो आणि ५ मेट्रिक टनांपर्यंत कचरा जवळच्या कचरा हस्तांतरण केंद्र अथवा कांजूरमार्ग कचरा प्रक्रिया प्रकल्पांच्या ठिकाणी वाहून नेला जातो. (BMC)

(हेही वाचा – CM Relief Fund Cell : मुख्यमंत्री सहायता निधी कक्षातून मार्च महिन्यात २५१७ रुग्णांना २२ कोटींची मदत)

मुंबई महापालिका (BMC) घनकचरा परिवहन विभागाच्या ताफ्यामध्ये ७६ मिनी कॉम्पॅक्टर आहेत. त्यापैंकी ३८ कॉम्पॅक्टर हे २०१७ मध्ये खरेदी केले गेले आहेत तर उर्वरीत ३८ कॉम्पॅक्टर्स हे २०२१ मध्ये खरेदी केले आहे. सन २०१७ मध्ये खरेदी केलेल्या कॉम्पॅक्टर्सचे आठ वर्षांचे आयुष्यमान हे २०२५ मध्ये समाप्त होणार आहे. त्यामुळे कचरा व्यवस्थापन सेवा खंडित पडण्याची शक्यता असून ३८ कॉम्पॅक्टर कालबाह्य होण्यापूर्वी महापालिका प्रशासनाकडून याची खरेदी केली जात आहे. वाहन चालकांच्या कमरतेमुळे आणि वाहन चालकांच्या नव्याने नियुक्त्या न झाल्याने घनकचरा व्यवस्थापन विभागाने ३८ ऐवजी प्रथम ३० कॉम्पॅक्टरची खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार ऑक्टोबर २०२४ मध्ये यासाठी निविदा मागवण्यात आली होती. यामध्ये ३० मिनी कॉम्पॅम्क्टर्सच्या खरेदीसाठी आणि त्यांच्या सात वर्षांच्या देखभालीसाठी २२ कोटी ४५ लाख ०२ हजार रुपये खर्च केले जाणार आहे. (BMC)

मे २०२१ मध्ये जेव्हा मिनी कॉम्पॅक्टर्सची खरेदी केली होती, तेव्हा भारत स्टेज सहाच्या वाहन चालकाच्या केबिनसह सांगडा खरेदीसाठी १३ लाख ५० हजार आणि त्या सांगड्याची बांधणीसाठ १५ लाख २१ हजार अशाप्रकारे एकूण २८ लाख ७१ रुपयांमध्ये कॉम्पॅक्टर खरेदी केले होते, त्यातुलनेत आता सन २०१४ मध्ये म्हणजे तीन वर्षांमध्ये याचा दर प्रचंड वाढल्याचे दिसून येत आहे. यासाठी पात्र ठरलेल्या अँटौनी मोटर्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने भारत स्टेज सहाच्या वाहन चालकाच्या केबिनसह सांगडा खरेदीसाठी २४ लाख १८ हजार रुपये एवढा दर आकारला आहे. तर सांगड्यावरील बांधणीसाठी २१ लाख ५३ हजार २५० रुपये एवढा दर आकारला आहे. त्यामुळे या मिनी कॉम्पॅक्टरची खरेदी ही सुमारे ४६ लाख रुपयांमध्ये केली जाणार आहे. जिथे सन २०२१ मध्ये २८ लाख ७१ हजारांमध्ये कॉम्पॅक्टरची खरेदी केली होती, तिथे ही खरेदी ४६ लाख रुपयांना केली जात आहे. (BMC)

(हेही वाचा – वक्फ सुधारणा विधेयक बुधवारी संसदेत होणार सादर; Uddhav Thackeray कोणती भूमिका घेणार?)

तसेच हमी कालावधीनंतर पहिल्या वर्षी प्रति माह २६ हजार २६२ रुपये आठव्या वर्षी प्रति माह ३९ हजार ४२९ रुपये एवढा दर आकारला आहे. सन २०२१ मध्ये देखभालीच्या पहिल्या वषी प्रति माह ११ हजार ६९६ रुपये एवढा दर होता तर आठव्या वर्षी प्रति माह २१ हजार ६८० एवढा दर होता. त्यामुळे मिनी कॉम्पॅक्टर्सच्या खरेदीत अँटोनी मोटर्स कंपनीला अधिक दराने हे कंत्राट दिल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे हमी कालावधीनंतर कॉम्पॅक्टरची देखभाल ही संबंधित कंपनीकडे असेल आणि संबंधित कंपनी महापालिकेच्या यान गृहातच याची देखभाल आणि दुरुस्ती करणार आहे. (BMC)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.