मंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी ५ सप्टेंबर रोजी मराठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange Patil)यांची भेट घेतली. या दोघांमध्ये पहाटे अडीच वाजेपर्यंत तब्बल 3 तास चर्चा झाली आहे. चर्चेदरम्यान मनोज जरांगे पाटील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याशी देखील फोनवर चर्चा केल्याचे समजते.
(हेही वाचा – Madrasa मध्ये सापडले संघाला ‘आतंकवादी’ संबोधणारे पुस्तक)
या भेटीविषयी विचारले असता शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत चर्चा झाली, अशी माहिती मनोज जरांगे यांनी दिली. मंत्री अब्दुल सत्तार म्हणाले की, शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत आणि मराठा आरक्षणाबाबत (Maratha reservation) काही ना काहीतरी तोडगा काढावा लागेल. आज कॅबिनेटमध्ये यावर चर्चा होणार आहे.
विदर्भ आणि मराठवाड्यात यंदा अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सरसकट आणि तात्काळ भरपाई द्यावी, यासह मराठा आरक्षणाच्या मागणीबाबत चर्चा झाल्याचे मनोज जरांगे यांनी सांगितले आहे. शेतकऱ्यांच्या नुकसानीवर देवेंद्र फडणवीस यांच्याशी देखील फोनवर चर्चा झाल्याचे मनोज जरांगे यांनी सांगितले.
मराठा आरक्षणाच्या मुद्यावर मनोज जरांगे समाधानी नाहीत. त्यामुळे वारंवार चालू असलेल्या त्यांच्या आंदोलनांवर तोडगा काढण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरु असल्याची माहिती मिळत आहे. ५ सप्टेंबर रोजी मुंबईत मंत्रीमंडळाची महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत मराठा आरक्षण आणि शेतकऱ्यांचे प्रश्न यावर चर्चा होणार असल्याची माहिती सत्तार यांनी दिली आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community