भिवंडीमधल्या ओबीसी मेळाव्यात मनोज जरांगे पाटील यांच्यावर अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी जहाल शब्दात टीका केली. त्यामुळे आता छगन भुजबळ आणि मराठा आंदोलक (Maratha Reservation) यांच्यातील संघर्ष पेटणार की काय, अशा चर्चा सुरू आहे.
या मेळाव्यात मंत्री छगन भुजबळ यांनी जरांगेंसमोर आणखी किती दिवस झुकणार, असा थेट सवालच शिंदे सरकारला केला आहे. जे ओबीसींविरोधात बोलतायत, त्यांचा कार्यक्रम येणाऱ्या निवडणुकीत करा, असं भुजबळांनी म्हटलंय. त्यामुळे आता हा वाद शमण्याऐवजी आणखी पेटणार की काय अशी चर्चा सुरू झाली आहे.
(हेही वाचा – Israel-Hamas Conflict: हमासला मोठा धक्का, इस्रायलने शोधला ‘सर्वात मोठा बोगदा’; वाचा सविस्तर.. )
ओबीसी लढाईबाबत जरांगे म्हणाले की, ओबीसी लढाई मी स्वत:साठी लढत नाही किंवा माझ्या घरच्यासाठी लढत नाही. मराठा समाजाला विरोध नाही आमचा विरोध झुंड शाहीला आहे. आमचे घर जाळले. जाळपोळ करणाऱ्याला विरोध आहे. मराठा समाजाला न्याय द्या आमचा विरोध नाही. अगोदरचे कुणबी आम्हाला मान्य आहे. काही जण कुणबी म्हणून फिरतात आणि खोटे दाखले दिले जातात. अगोदर आमचे आरक्षण भरा नंतर दुसऱ्यांना द्या. खोटे कुणबी घेऊन आलेत.
यावर मंत्री छगन भुजबळ यांनी ‘जरांगे आमची लायकी काढतात. येवल्याचा येडपट बोलतात. अगोदर मर्कट आहे. बेवडा पिऊन किडन्या. आमची लायकी काढतोय. आमची मुलं हुशार आहेत’, असं म्हणत छगन भुजबळ यांनी जरांगेवर जहरी टीका केली.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community