राज्यातील सुमारे 50 बस स्थानके अद्ययावत केली जाणार आहेत. त्यामुळे बस स्थानकांचे चित्र पालटणार असून प्रवासी सुविधेत वाढ होणार आहे. राज्य परिवहन महामंडळाने याबाबतचा प्रस्ताव तयार केला असून तो मंत्रिमंडळासमोर ठेवण्यात आला आहे. याला मंजुरी मिळाल्यानंतर, लवकरच त्यावर काम करण्यावर भर दिला जाणार असल्याचे परिवहन मंत्री अनिल परब म्हणाले.
काळानुरुप एसटी बसेसमध्ये बदल करण्यात आले, पण एसटी स्थानकांमध्ये काहीही बदल करण्यात आला नाही. त्यामुळे प्रवाशांची सुविधा व्हावी, तसेच त्यांना एसटीबाबत सर्व माहिती स्थानकावर अद्ययावतरित्या उपलब्ध व्हावी यासाठी स्थानके अद्ययावत करणे गरजेचे असल्याचे परिवहन मंत्री अनिल परब यावेळी म्हणाले.
( हेही वाचा: महत्त्वाची बातमी; नवी मुंबईत ‘या’ दिवशी पाणीपुरवठा बंद )
पर्यावरणपूरक सेवा
राज्य परिवहन महामंडळाची प्रवासी सेवा आता पर्यावरणपूरक होत आहे. पहिल्या टप्प्यांत 150 ई-बस दाखल होत आहे. त्यानंतर येत्या दीड ते दोन वर्षांत सुमारे तीन हजार ई-बस महामंडळ घेणार आहे. तसेच, सीएनजीवर धावणा-या बसेसही एसटीच्या ताफ्यात दाखल होणार आहेत.
Join Our WhatsApp Community