महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मंत्री कार्यालयाचा अनुभव; कौशल्य विकास मंत्री Mangal Prabhat Lodha यांचा उपक्रम

30
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मंत्री कार्यालयाचा अनुभव; कौशल्य विकास मंत्री Mangal Prabhat Lodha यांचा उपक्रम
  • प्रतिनिधी

युवकांना काळानुरूप कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देऊन अधिकाधिक रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी कौशल्य विकास विभाग काम करत आहे. या उद्देशाने, कौशल्य विकास विभागाने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मंत्रालयातील कार्यप्रणालीचा अनुभव मिळवून देण्यासाठी एक अनोखा उपक्रम आयोजित केला.

कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा (Mangal Prabhat Lodha) यांनी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना त्यांच्या मंत्रालयातील कार्यालयात एक दिवसाचा अनुभव घेण्यासाठी आमंत्रित केले. यामध्ये विद्यार्थ्यांना मंत्रालयाच्या कामकाजाचा थेट अनुभव मिळाला. यासाठी ‘यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क’ या उपक्रमात विद्यार्थ्यांचे शॅडो मंत्रिमंडळ स्थापन करण्यात आले, ज्यात विद्यार्थ्यांना शासकीय विभागांच्या कामकाजाची सखोल माहिती मिळाली.

(हेही वाचा – भारताची ‘चांद्रयान-४’ मोहिम २०२७ ला प्रक्षेपित करणार; मंत्री Jitendra Singh यांची माहिती)

कौशल्य विकास मंत्री लोढा (Mangal Prabhat Lodha) यांनी विद्यार्थ्यांना एक तासासाठी आपल्या कार्यालयाचा कार्यभार अभिरुप स्वरूपात सोपवला. यावेळी, मंत्री लोढा यांनी सांगितले की, “आजचे विद्यार्थी उद्याचे नेते असतील, त्यांना प्रशासनाच्या कार्यप्रणालीचा अनुभव देणे अत्यंत आवश्यक आहे. भविष्यात आपल्या लोकशाहीला जपणारे हे प्रतिनिधी प्रशासनाच्या संपर्कात येतील तेव्हा त्यांना हा अनुभव आठवेल.”

यावेळी कौशल्य विकास विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा वर्मा, आयुक्त नितीन पाटील, व्यवसाय व शिक्षण प्रशिक्षण संचालनालयाच्या संचालिका माधवी सरदेशमुख यासह यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्कचे मंत्रिमंडळ, समृद्धी तुपे (मुख्यमंत्री), रिया खानोलकर (गृहमंत्री), पार्थ थोरवत, आर्यन दराडे (उपमुख्यमंत्री), पर्णवी धावरे (सभापती) यांची उपस्थिती होती.

(हेही वाचा – अ.भा. मराठी साहित्य संमेलनाचा शुभारंभ Veer Savarkar यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करूनच व्हावा; MP Medha Kulkarni यांचे आयोजकांना आवाहन)

अपर मुख्य सचिव मनीषा वर्मा यांनी या उपक्रमात केंद्र शासनाच्या योजनांची, कौशल्य विकास विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या योजनांची, तसेच विभागाचे कामकाज व युवांना देण्यात येणारे विविध प्रशिक्षण यांची सविस्तर माहिती दिली. यामुळे विद्यार्थ्यांना सरकारी कामकाजाची समज मिळाली आणि त्यांचा दृष्टिकोन अधिक विस्तृत झाला. येत्या काळात हे विद्यार्थी लोकशाहीतील प्रभावी नेतृत्व करण्यास सक्षम होतील, हे लक्षात घेता, कौशल्य विकास मंत्री लोढा (Mangal Prabhat Lodha) यांचे हे उपक्रम अत्यंत महत्त्वाचे ठरले आहेत.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.