Ministry Building Renewal: मंत्रालयासमोरील प्रशासकीय इमारतीचे होणार नूतनीकरण, राज्य सरकार करणार ८२ लाखांचा खर्च 

111

मंत्रालयासमोरील निवडणूक आयोगाच्या (Election Commission) नवीन प्रशासकीय इमारतीत विधी अधिकारी व अवर सचिवांसाठी प्रशस्त दालन उपलब्ध करण्यात येणार आहे. १९ मजल्यावरील निवडणूक आयोगाच्या कार्यालयाचे नूतनीकरण, यासह विविध कामे हाती घेण्यात येणार आहेत. यासाठी राज्य सरकार तब्बल ८२ लाख ६६ हजार ४७० रुपये खर्च करणार आहे. (Ministry Building Renewal)

सामान्य प्रशासन विभागाच्या (General Administration Department) अखत्यारितील राज्य निवडणूक आयोगाच्या नविन प्रशासकीय भवन इमारतीतील (New administrative building renovation) कार्यालयाचे नूतनीकरण, विधी अधिकारी, अवर सचिवांसाठी प्रशस्त दालन, उपायुक्तांसाठी नवीन दालन उपलब्ध करणे, तहसीलदारांसाठी स्वतंत्र दालन उपलब्ध करण्यात येणार आहे, यासाठी ८२ लाख ६६-हजार रुपये खर्च करण्यात येणार आहेत. राज्याच्या सार्वजनिक – बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता यांनी या खर्चास मान्यता दिली आहे.

(हेही वाचा – Champions Trophy 2025 : पाकच्या मैदानांवर भारतीय तिरंगाच नसल्यामुळे नवीन वाद सुरू)

असा होणार खर्च 
  • आयोगाच्या १९ व्या मजल्यावरील कार्यालयाचे नूतनीकरण करणे – ३३ लाख ४४ हजार ८९७ रुपये खर्च. 
  •  उपायुक्तांसाठी नवीन दालन तयार करणे – ८ लाख ३४ हजार ४५१ रुपये खर्च. 
  • नवीन नियुक्त विधी अधिकारी व अवर सचिव यांच्यासाठी नवीन दालन २६ लाख १२ हजार ९४९ रुपये खर्च.
  • दोन तहसीलदार यांना केबिन तयार करणे १४ लाख ७० हजार १७३ रुपये खर्च.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.