-
प्रतिनिधी
मंत्रालयात (Ministry) प्रवेशासाठी डीजी प्रवेश नावाची अत्याधुनिक प्रणाली सुरू झाली आणि प्रशासनाने छातीठोकपणे घोषणा केली की, आता सगळं डिजिटल होणार, रांगा संपणार, आणि प्रत्येक अभ्यागताची नोंद ठेवली जाणार! पण ही “नवी प्रणाली” प्रत्यक्षात कचऱ्याचा डबा बनली आहे, हे पाहून हसावं की रडावं हेच कळेनासे झाले आहे. डीजी प्रवेश ॲपद्वारे दुपारी दोननंतर अपॉइंटमेंट घेऊन मंत्रालयात (Ministry) येणाऱ्यांना गळ्यात अडकवण्यासाठी पास दिला जातो. हा पास बाहेर पडताना ड्रॉप बॉक्समध्ये टाकायचा, अशी सोपी योजना. पण आमच्या सर्वसामान्यांनी या डब्यात पासऐवजी कचरा, पाण्याच्या बाटल्या आणि बसची तिकिटे टाकून नव्या युगाची सुरुवातच वेगळ्या पद्धतीने केली आहे!
(हेही वाचा – Kedar Jadhav : माजी भारतीय क्रिकेटपटू केदार जाधवची नवीन राजकीय इनिंग, भाजपामध्ये प्रवेश)
प्रशासनाने डब्यात पास मिळतील अशी अपेक्षा ठेवली, पण त्याऐवजी चुरमुरे, बिस्किटांचे पुडे आणि कोल्ड्रिंकच्या रिकाम्या बाटल्या मिळाल्या. एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले, “आम्ही पास गोळा करायला गेलो, तर डबा उघडताच दुर्गंधी आली. ही प्रणाली आमच्यासाठी की आम्हाला त्रास देण्यासाठी, हेच कळत नाही.” उन्हाळ्याच्या कडक ऊनात रांगेत उभे राहून पास मिळवणाऱ्या सामान्य माणसाला तर दुप्पट कष्ट पडत आहेत – एकदा रांगेत, आणि दुसरे काम होईल की नाही याची शाश्वती नसताना. (Ministry)
(हेही वाचा – जयपूर साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी शिक्षा सुनावताना Terrorist हसत होते; बॉम्बस्फोटात ७१ जणांचा झालेला मृत्यू)
मंत्रालयात (Ministry) येणाऱ्यांची नोंद ठेवण्याचा उद्देश डिजिटल प्रणालीचा होता, पण लोकांनी ड्रॉप बॉक्सला कचराकुंडी बनवून टाकले. “काम होत नाही, तरी कचरा तरी टाकून जाऊ,” अशी भावना लोकांमध्ये दिसते. दरम्यान, रांगा कायम आहेत, उकाडा वाढलाय, आणि पास काढूनही कामाची खात्री नाही. प्रशासनाला आता नवे ॲप काढावे लागेल – कचरा व्यवस्थापनासाठी! खरंच, तंत्रज्ञान बदलले, पण माणसाच्या सवयी बदलायला अजून काही काळ लागेल, की काय?
हेही पहा –
Join Our WhatsApp Community