इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने विद्यमान माहिती तंत्रज्ञान नियमांचे पालन सुनिश्चित करून सर्व कंपन्यांना मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.AI-चालित डीपफेकद्वारे चुकीच्या माहितीच्या प्रसाराविषयीच्या वाढत्या चिंतेमुळे केंद्र सरकारने सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मना माहिती तंत्रज्ञान (IT) नियमांचे पालन करण्याचे आवाहन करणारे सर्वसमावेशक निर्देश जारी केले आहेत. केंद्र सरकार विशेषत: माहिती नियमांचे कायदेशीर उल्लंघन झाल्यास संबंधितांवर कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल, असा इशारा केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी दिला आहे. (Rajiv Chandrashekhar)
कंपन्यांशी डिजिटल इंडिया संवादादरम्यान केलेल्या चर्चेनंतर एका महिन्याच्या आत या मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या.नियम 3(1)(बी) चे उल्लंघन झाल्यास, आयपीसी आणि माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 मधील दंडात्मक तरतुदींसह, वापरकर्त्यांना माहिती दिली जाईल, हे डिजिटल कंपन्यांनी सुनिश्चित केले पाहिजे यावर सल्लागार सूचनांमध्ये भर देण्यात आला आहे. माहिती तंत्रज्ञान कायद्याचे उल्लंघन झाल्यास लागू होऊ शकणाऱ्या अशा इतर कायद्यांच्या विविध दंडात्मक तरतुदींबद्दल जागरूक केले पाहिजे. असे मार्गदर्शक सूचनांमध्ये म्हटले आहे. (Rajiv Chandrashekhar)
एका महिन्याच्या कालावधीत, राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी डीपफेकच्या महत्त्वाच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी प्रमुख उद्योजकांसोबत महत्त्वपूर्ण आधिकाऱ्यांच्या बैठका बोलावल्या होत्या.यामध्ये त्यांनी सर्व सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्म साठी सध्याचे कायदे आणि नियमांचे कठोरपणे पालन करणे अनिवार्य आहे असे सांगितले. पुढे बोलताना राजीव चंद्रशेखर म्हणाले, “चुकीच्या माहितीमुळे इंटरनेटवरील वापरकर्त्यांच्या सुरक्षिततेला आणि विश्वासाला मोठा धोका बसला आहे.
हेही पहा –