प्लास्टिक कचरा व्यवस्थापन सुधारणा नियम 2021 नुसार एकेरी प्लास्टिक वापरावर 1 जुलै 2022 पासून बंदी घालण्यात येणार आहे. जगावर प्लास्टिक प्रदूषणाचं संकट घोंगावत आहे. त्यामुळे अनेकवेळा सरकारने प्लास्टिक बंदीबाबत निर्णय घेतला, मात्र त्याची कठोर अंमलबजावणी झालीच नाही. त्यामुळे आता 1 जुलै 2022 पासून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने एकल प्लास्टिक वापरावर बंदी घातली आहे.
या वस्तूंवर बंदी
एकेरी वापराच्या प्लास्टिकमुळे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे मंत्रालयाने सांगितले आहे. ध्वज, फुगा, आईस्क्रिम आणि कॅंडीसाठी वापर असलेल्या प्लास्टिकच्या काड्या, सजावटीसाठी वापरण्यात येणारा थर्माकाॅल यांचा या एकल प्लास्टिकमध्ये समावेश आहे. तसेच कप, ग्लासेस, कटलरी जसे काटे, चमचे, चाकू, ट्रे, स्वीट बाॅक्स, आमंत्रण कार्ड आणि सिगारेटच्या पॅकेटवर प्लास्टिक रॅप अशा वस्तूंचा समावेश आहे.
( हेही वाचा: नवी मुंबई कशी होणार प्रदूषण मुक्त? वाचा )
नोटीस जारी
या प्लास्टिकच्या उत्पादनांची आयात, साठा, वितरण, विक्री आणि वापर करता येणार नाही. निर्णयाची अंमलबजावणी येत्या 1 जुलैपासून करण्याचा निर्णय महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने घेतला आहे. एकेरी वापराच्या प्लास्टिक वस्तूंच्या वापरावर बंदी घालण्याचा निर्णय पर्यावरण विभागाने 12 ऑगस्ट 2021 रोजी अधिसूचना जारी करुन घेतला आहे. त्यासंदर्भात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने नोटीस जारी केली आहे.
Join Our WhatsApp Community