प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. त्यामध्ये ४ पद्म विभूषण, १७ पद्म भूषण आणि १०७ पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
(हेही वाचा बापरे…मंत्रालयाचे गेट बनले सुसाईट स्पॉट! शेतकरी, बेकार तरुण आता पोलिस…)
पद्म विभूषण पुरस्काराने सन्मानित होणाऱ्या सन्माननीय व्यक्तींमध्ये जनरल बिपीन रावत, कल्याण सिंह यांच्यासह चार जणांचा समावेश करण्यात आला आहे. तसेच पद्म भूषण पुरस्काराने सन्मानित केले जाणाऱ्यांमध्ये काँग्रेसचे नेते गुलाम नबी आझाद, पश्चिम बंगालचे बुद्धदेव भट्टाचार्य, कोवॅक्सीन लसीचे निर्माते कृष्णा इल्ला दंपती, कोविशील्ड लसीचे निर्माते सायरस पुनावाला, सत्या नाडेला, सुंदरराजन पिचाई यांना पद्म भूषण पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. पद्म श्री पुरस्काराने १०७ जणांना सन्मानित करण्यात येणार आहे. त्यामध्ये गायक सोनू निगम यांचा समावेश आहे.
Join Our WhatsApp Community