आता मंत्रालयात एक दिवसाआड काम होणार!

आता महाराष्ट्र सराकरने कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून मंत्रालयातील कामकाजाच्या वेळापत्रकात बदल केले आहेत.

राज्यात आटोक्यात आलेला कोरोना आता पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर उफाळून येत आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ही आता झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे आता महाराष्ट्र सराकरने कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून मंत्रालयातील कामकाजाच्या वेळापत्रकात बदल केले आहेत.

प्रत्येक विभागाला सूचना

संपूर्ण राज्याचे कामकाज जिथून पार पाडले जाते त्या मंत्रालयात काही दिवसांपूर्वी कार्यालयीन वेळापत्रकात बदल करत, कामकाज दोन शिफ्टमध्ये चालणार असल्याचे सांगण्यात आले होते. पण आता मंत्रालयात दोन शिफ्टऐवजी एक दिवसाआड काम करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोना संसर्ग टाळण्यासाठी उपाययोजना म्हणून आता हा निर्णय घेण्यात आला असल्याचे समजते. मंत्रालयातील प्रत्येक विभागाच्या सचिवांनी कर्मचा-यांची विभागणी करावी, असे आदेश देण्यात आले आहेत.

(हेही वाचाः लसीकरणाबाबत झोपडपट्टीतील नागरिकांमध्ये उदासीनता! )

मुख्य सचिवांच्या सूचना

मंत्रालयामधील कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे मंत्रालयात कर्मचाऱ्यांच्या कामाचे नियोजन करण्यासाठी मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी सर्व सचिवांना सूचना केल्या होत्या. यात आठवडा, प्रत्येकी 1 दिवसाआड अथवा 3 दिवस अदलाबदली कर्मचारी काम करण्याबाबत नियोजन करावे, अशी सूचना देण्यात आली होती.

नाहीतर नाईलाजाने लॉकडाऊन

राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने राज्य सरकारने आता कठोर निर्बंध घालण्यास सुरुवात केली आहे. शासकीय कार्यालयांसोबतच खाजगी कार्यालयांच्या वेळापत्रकातही बदल करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही राज्यातील जनतेला नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन केले आहे. जर रुग्ण संख्या आटोक्यात आली नाही तर नाईलाजाने पुन्हा एकदा लॉकडाऊनचा पर्याय निवडावा लागेल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.

(हेही वाचाः राज्यात कोरोनाचा उद्रेक; १६,६२० नवीन रुग्ण!)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here