त्रिपुरातील (Tripura) कदमतला (Kadamtala) भागात एका बंद मदरशाच्या (Madrasa) वसतिगृहात एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. ही घटना दि. १२ एप्रिल रोजी घडली. त्यावेळी पीडित मुलगी एका लग्नाला जात होती. पोलिसांनी सांगितले की, दोन जणांनी पीडितेवर बलात्कार केला आणि तिला मदरसाच्या (Madrasa) वसतिगृहात सोडले. (Tripura)
( हेही वाचा : Salman Khan ला पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी ; म्हणाले, “बॉम्बने उडवू …”)
पीडित मुलगी अस्वस्थ अवस्थेत घरी पोहोचली. त्यानंतर पीडितेने कुटुंबियांना घडलेला सर्व प्रकार सांगितला. दरम्यान आजूबाजूच्या लोकांनी आरोपीचा शोध सुरु केला आणि त्याच रात्री आरोपींपैकी एकाला त्याच्या घरातून पकडण्यात आले. आरोपी हा १९ वर्षीय कामगार असल्याची माहिती वृत्तसंस्थांनी दिली आहे. तर दुसरा आरोपी अल्पवयीन असल्याचे सांगण्यात येत आहे. १४ वर्षीय पीडित मुलगी धर्मनगर (Dharmanagar) उपविभागातील कुर्ती गावातील (Kurti village) रहिवासी होती. या भागात एका नातेवाईकाच्या लग्नाला उपस्थित राहण्यासाठी ती घराबाहेर पडली होती. वाटेत, तिचे आरोपींनी अपहरण केले आणि तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. (Tripura)
पीडितेच्या तक्रारीवरून दोन्ही संशयितांविरुद्ध POCSO अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याचे कदमतला पोलिसांनी (Kadamtala Police) सांगितले. दुसऱ्या आरोपीला पकडण्यासाठी पोलिस प्रयत्न करत आहेत. यासोबतच पीडितेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. (Tripura)
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community