छत्रपती शिवरायांचा वारसा लाभलेला मिरा-भाईंदर शहरातील ऐतिहासिक घोडबंदर किल्ला (Ghodbunder Fort) भाडे तत्त्वावर चालवण्यास देण्याचा वादग्रस्त निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भात सुधारित ठराव अलिकडेच मंजूर करण्यात आला. पालिकेने राज्य शासनाकडून हा किल्ला देखभालीसाठी आपल्या ताब्यात घेतला होता. मात्र आता तो थेट भाडे तत्त्वावर देण्याच्या निर्णयामुळे संताप व्यक्त होत आहे.
महापालिकेच्या वास्तूंना भाडे तत्त्वावर देऊन उत्पन्न मिळविण्याचा सुधारित ठराव पालिकेने ९ जुलै रोजी मंजुर केला असून त्यात भाईंदर (Bhayander) पश्चिम येथील क्रीडा संकुल, आप्पासाहेब धर्माधिकारी हॉल, मैदाने, उद्यानांबरोबरच घोडबंदर किल्ल्याचाही समावेश आहे. त्यामुळे या ऐतिहासिक वास्तूच्या अस्तित्वाला धोका निर्माण होण्याची भीती आहे. (Mira-Bhayander Municipal Corporation)
(हेही वाचा – Mumbai Job Advertise : मुंबईत मराठी माणसाची पुन्हा गळचेपी! नोकरी फक्त ‘नॉन-महाराष्ट्रीन’साठी; मनसेने दिला दणका!)
केवळ उत्पन्न मिळविण्यासाठी थेट किल्लाच भाड्याने देण्याच्या निर्णयावर टीका होत असून या निर्णयाच्या विरोधात गुरुवारी (२५ जुलै) रोजी शिवसेनेने आक्रमक पवित्रा घेऊन काळ्याफिती लावून महानगरपालिकेच्या आयुक्तांना अर्ज दिला. यात हा अध्यादेश ताबडतोब मागे घ्या नाहीतर तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. (Mira-Bhayander Municipal Corporation)
संबंधित अधिकाऱ्यांकडे याबाबत विचारणा केली असता, केवळ किल्ल्यावरील रोषणाई कार्यक्रम आणि इतर गोष्टी भाडे तत्त्वावर देणार असल्याचे स्पष्टीकरण महापालिकेचे शहर अभियंता दीपक खांबित (Deepak Khambit) यांनी दिले. मात्र किल्ल्यावर अद्याप महापालिकेकडून कोणताही रोषणाई कार्यक्रम आणि इतर कोणत्याही गोष्टीची उभारणी करण्यात आलेली नसून तसा कुठलाही ठराव करण्यात आलेला नाही. त्यामुळे हा निर्णय अंगाशी आल्याने पालिका सारवासारव करत असल्याचे चित्र आहे. दरम्यान आमदार प्रताप सरनाईक यांनी मिरा-भाईंदर महापालिका आयुक्तांना पत्र लिहून हा ठराव तत्काळ रद्द करण्याच्या सूचना केल्या आहेत.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community