मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी सध्या एनआयए कसून तपास करत आहे. त्यासाठी या प्रकरणात अटकेत असलेला सचिन वाझे याला सोबत घेऊन ठिकठिकाणी फिरत आहे. वाझे याच्या चौकशीतून आता एनआयएला मिरा रोड कनेक्शन सापडले आहे.
फ्लॅट गेल्या १५ दिवसांपासून बंद अवस्थेत!
एनआयएचे पथकमिरा रोड येथील सेवन इलेव्हन कॉम्प्लेक्स परिसरात असलेल्या एका फ्लॅटची झडती घेण्याकरता दाखल झाले. कारण मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाशी या घराचे धागेदोरे जुळले असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मिरा रोड येथील कनकिया परिसरात असलेल्या सेवन इलेव्हन कॉम्प्लेक्समधील सी विंग ४०१ येथील फ्लॅटमध्ये एनआयएच्या पथकाने गुरुवारी, १ एप्रिल रोजी संध्याकाळी ६.३० वाजताच्या सुमारास धाड टाकली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ही खोली गेल्या १५ दिवसांपासून बंद अवस्थेत होती. मात्र आता फ्लॅटचा दरवाजा उघडण्यात आला असून एनआयए पथक तपास करत आहे. मिळालेल्या माहितीनुसार सचिन वाझे प्रकरणाच्या तपासाकरता एनआयए दाखल झाली आहे. मात्र त्या फ्लॅटचा आणि या प्रकरणाचा नेमका संबंध काय, हे अद्याप स्पष्ट झाले नाही.
(हेही वाचा : एनआयएमधून आलेल्या अधिकाऱ्याकडे सीआययूची धुरा! )
तो फ्लॅट ख्रिश्चन कुटुंबाला भाड्याने दिला!
मिरा रोडमध्ये राहणाऱ्या पियुष गर्ग यांचा सेव्हन इलेव्हन कॉम्प्लेक्स सी विंग ४०१ हा फ्लॅट होता. तो जाफर शेख इस्टेट एजंट दलाल यांच्या माध्यमातून विकत घेतला होता. मागील चार वर्षांपासून हा फ्लॅट एक ख्रिश्चन कुटुंबाला भाड्याने दिला आहे. त्यामध्ये मीना जॉर्ज ह्या राहतात. मात्र मागील १५ दिवसांपासून हा फ्लॅट बंद होता. एनआयएच्या अधिकाऱ्यांनी आता त्याची चौकशी सुरु केली आहे.
Join Our WhatsApp Community