चंद्रपुरातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात ऑनलाईन बुकिंगमध्ये झालेल्या आर्थिक गैरव्यवहारामुळे सध्या जंगल सफारीचे ऑनलाईन बुकिंग बंद करण्यात आले आहे. त्यामुळे दिवाळीनंतरच्या नाताळ आणि नवीन वर्षाच्या सुट्टी काळातील बुकिंगवर परिणाम झाला असल्यामुळे सफारी बुकिंग बंद असल्याने रिसॉर्ट बुकिंग, जिप्सी बुकिंग, टॅक्सी बुकिंग सर्वच ठप्प पडले आहे.
(हेही वाचा –Neeraj Chopra : पाकिस्तानी खेळाडूला मागे टाकत भारताच्या नीरज चोप्राने सुवर्णपदक जिंकून रचला इतिहास )
चंद्रपूरच्या प्रसिद्ध व्याघ्र प्रकल्पासाठी ऑनलाईन तिकीट बुकिंग करणाऱ्या डब्ल्यूसीएस कंपनीवर 12 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप वन विभागाने केला आहे. त्यासंदर्भात वन विभागाने बुकिंग कंपनीच्या विरोधात पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे, मात्र ऑनलाईन तिकिट बुकिंग कंत्राटच्या अटी आणि त्यातील बुकिंगचा अधिकार हा वाद न्यायालयात गेल्यामुळे त्यावर तोडगा निघेपर्यंत ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील सफारी बुकिंग बंद ठेवण्याचा न्यायालयाने आदेश दिला आहे. या आदेशामुळे पर्यटन व्यवसायाशी संबंधित व्यावसायिकांची चिंता वाढली आहे.
जंगल सफारीचे ऑनलाईन बुकिंग अनिश्चित काळासाठी बंद असल्याने बुकिंगचा पर्यायी मार्ग सुरू करण्याची मागणीही करण्यात येत आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community