- विशेष प्रतिनिधी, मुंबई
मुंबई महानगरपालिकेच्यावतीने चांदिवली येथील ६० फूटी विजय फायर मार्ग व जंगलेश्वर मंदिर मार्ग (खैरानी रस्ता) यामधील ‘मिसिंग लिंक’ जोडणी प्रकल्प हाती घेण्यात आला असून या मार्गावरील अडथळा ठरणाऱ्या पाच बांधकामांवर अखेर गुरुवारी कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे चांदिवली परिसर व असल्फा-घाटकोपर यांना थेटपणे जोडणारा रस्ता आता उपलब्ध होणार आहे. आता नागरिकांना खैरानी मार्गावरील वाहतूक कोंडी आणि वळसा घालून वाहतूक करण्याची समस्या कायमचीच दूर होणार आहे. (Missing Link Project)
(हेही वाचा – Sanjay Shirsat यांच्या कन्येने कोणतेही अधिकृत पद नसताना सिडकोच्या कामांचा घेतला आढावा)
चांदिवली परिसर व असल्फा-घाटकोपर यांना थेटपणे जोडणारा रस्ता सध्या अस्तित्वात नाही. चांदिवलीमधील नागरिकांना साकीनाका जंक्शनला वळसा घालून घाटकोपरकडे जावे लागते. तसेच, नहार ले आउटमधील खैरानी मार्गास जोडणारा रस्ता अत्यंत अरुंद असल्याने या ठिकाणी मोठी वाहतूक कोंडी होती. या पार्श्वभूमीवर ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या रस्ता जोडणी (मिसिंग लिंक) प्रकल्पामध्ये आनंदीबाई सुर्वे उद्यानाजवळ ०५ बांधकामांचा अडथळा होता. (Missing Link Project)
(हेही वाचा – Hindu : हिंदू आध्यात्मिक आणि सेवा मेळाव्यातील सनातन संस्थेच्या स्टॉलचे राजेंद्र वराडकर यांच्या हस्ते उद्घाटन)
या बांधकामांना ‘एल’ विभागाकडून नोटीस देऊन, कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. ही बांधकामे गुरुवारी ०९ जानेवारी २०२४ रोजी पाडण्यात आली. उप आयुक्त (परिमंडळ-५) देविदास क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सहायक आयुक्त धनाजी हेर्लेकर यांच्या नेतृत्वाखाली निष्कासनाची कार्यवाही करण्यातआली. त्यामुळे ‘मिसिंग लिंक’ जोडणीचा मार्ग मोकळा झाला असून रस्ते विभागामार्फत या ठिकाणी रस्ते विकासाची कार्यवाही तात्काळ सुरु करण्यात येणार असल्याची माहिती महापालिका प्रशासनाने दिली आहे. (Missing Link Project)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community