अमूल, महानंद आणि मदर डेअरीसह इतर दुधाच्या किंमतीत वाढ झाली आहे. दुधाच्या दरात लिटरमागे २ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. दुग्धजन्य पदार्थांपासून मिठाई तयार करण्यात येते. दुधाच्या किंमती वाढल्याने मिठाई दुकानदार चिंताग्रस्त झाले आहेत. दुधाचे भाव वाढल्याने आता ग्राहकांना मिठाईसाठी सुद्धा अधिक पैसे मोजावे लागणार आहेत.
( हेही वाचा : रत्नागिरीच्या समुद्रात बोट बुडाली; दोन खलाशी बेपत्ता)
मिठाईचा गोडवा महागणार
पाच लिटर दूध उकळवल्यानंतर एक किलो खवा तयार होतो. परिणामी आता मिठाईचा गोडवा महागणार आहे. दुधापासून रबडी, रसगुल्ला, बर्फी या मिठासोबत पनीर, दही, लस्सी, तार हे पदार्थही तयार होतात तसेच सरकारने पॅकबंद दही, लस्सीवर सरकारने ५ टक्के जीएसटी लावला आहे. यामुळे आता सर्वसामान्यांच्या खिशाला चांगलीच कात्री बसणार आहे.
चार वर्षात १५ रुपयांनी दूध महागले
गेल्या ४ वर्षांमध्ये दुधाच्या किंमतीत सातत्याने वाढ करण्यात येत आहे. चार वर्षांपूर्वी दूध ४० ते ४५ लिटर दराने होते आता दुधाचे दर ६५ रुपये झाले आहेत. म्हणजेच गेल्या चार वर्षांमध्ये दुधाचे दर १५ रुपयांनी वाढले आहेत.
Join Our WhatsApp Community