महापालिकेच्या एच/पूर्व विभागातील वांद्रे येथील मिठी नदीवरील ड्राइव्ह इन थिएटर जवळील पुलाचे रुंदीकरण आणि पुनर्बांधणी करण्याचे काम हाती घेण्यात आले असून या कामात चक्क पावणे चार कोटींनी वाढ झाली. कंत्राटदारांची निवड करून तीन वर्षे झाली तरी कामाला सुरुवात झाली नाही. अखेर आता या पुलाच्या कामाला सुरुवात होत आहे. वनविभागाच्या अटी व शर्तीनुसार पुलाच्या बाजुला संरक्षक भिंत बांधुन त्यावर ध्वनी प्रदुषण दुभाजक लावण्यात येत असल्यामुळे या अतिरिक्त खर्चात वाढ झाल्याचे बोलले जात आहे.
मिठी नदीवरील कलानगर हया ठिकाणी (ड्राईव्ह इन थियटर) येथील पुलाचे काम हे एमएमआरडीएच्या वतीने करण्यात आले होते. परंतू नवीन आराखड्यानुसार या पुलाच्या खर्चात अमुलाग्र वाढ होत होती. त्यामुळे सध्या अस्तित्वात असलेला पूल वाहतुकीसाठी पूर्ववत ठेऊन पुलाच्या दक्षिणेकडील भागाचे ९.३ मी. रुंदीकरणाचे काम करणे. हे पूल १०८ मीटर लांबीचा असून त्यावर ५४ मी. लांबीचे दोन स्पॅन गर्डरच्या व्दारे काम करण्याचा निर्णय घेतला होता.
(हेही वाचा The Kerala Story : ‘लव्ह जिहाद’विषयी हिंदू जागृत होईल या भीतीने ‘द केरळ स्टोरी’ला विरोध)
यासाठी १४ मार्च २०१८ च्या स्थायी समितीच्या मंजुरीने मे. एच.व्ही. कन्स्ट्रक्शन्स या कंत्राटदाराच्या नेमणुकीला मंजुरी देत २ मे २०१८ मध्ये कार्यादेश देण्यात आला. यासाठी ३५.८२ लाखांचा खर्च मंजूर होता. हे काम पावसाळा वगळून २४ महिने होते, पण प्रत्यक्षात हे काम वन विभागाची परवानगी व ना हरकत प्रमाणपत्र मिळाल्यानंतर ०१ नोव्हेंबर २०१९ रोजी चालु करण्यात आले होते. म्हणजेच १८ महिने उशीराने सुरू झाले होते. हा पूल कांदळवन क्षेत्रात येत असल्यामुळे वन विभागाची ना-हरकत परवानगी घेण्यात आली आहे. वनविभागाच्या अटी व शर्तीनुसार पुलाच्या बाजुला संरक्षक भिंत बांधून त्यावर ध्वनी प्रदुषण दुभाजक लावण्यात येत असल्यामुळे अतिरिक्त खर्च वाढला आहे.
हे या पुलाचे काम ऑक्टोबर २०२२ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. त्यानंतर कोव्हीड १९ आणि काही तांत्रिक अडचणीमुळे प्रकल्पाचे काम पूर्ण झाले नाही, तसेच, एमएमआरडीएच्या आयकॉनिक पध्दतीच्या प्रस्तावामुळे एप्रिल २०२१ पासून काम बंद ठेवण्यात आले होते. सद्यस्थितीत सर्व तांत्रिक अडचणी दुर झाल्यामुळे पुढे ३० एप्रिल २०२४ पर्यंत करण्यास म्हणजेच एकूण कंत्राट कालावधी ३९ महिने करण्यात आला.कंत्राट ३५.८२कोटी रुपये असून त्यात ३.८७ कोटींची वाढ होऊन वाढ ३९.७० कोटी रुपये एवढी रक्कम झाली आहे. अजून या प्रकरणात आरोप निश्चिती झाली नाही.
Join Our WhatsApp Community