Mithi River च्या सफाई कामाला अद्याप सुरुवात नाही; एका भागातील निविदा वादात?

141
Mithi River च्या सफाई कामाला अद्याप सुरुवात नाही; एका भागातील निविदा वादात?
  • विशेष प्रतिनिधी, मुंबई

मुंबईत नालेसफाईच्या कामाचा शुभारंभ झाला असला तरी प्रत्यक्षात मिठी नदीतील (Mithi River) गाळाची सफाई अद्याप झालेली नसून या मिठी नदीच्या निविदेतील अटींमुळे कमी बोली लावूनही कंत्राटदाराला काम न देता दुसऱ्या क्रमांकावरील कंत्राटदाराला काम देण्याचा प्रयत्न झाला आहे. त्यामुळे मिठी नदीच्या निविदा प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

मुंबईतील २६ जुलैच्या महापुराला कारणीभूत ठरलेल्या मिठी नदीचे (Mithi River) रुंदीकरण तसेच खोलीकरण करून या नदीला पुनर्रुज्जीवन देण्यासाठी आतापर्यंत सुमारे २ हजार कोटींहून खर्च करण्यात आले आहे. तरीही दरवर्षी मिठी नदीतील गाळ सफाईवर सरासरी ९० कोटी रुपये खर्च केले जात असून या गाळ सफाईच्या कामातील अनियमिततेबाबत एसआयटीच्या माध्यमातून चौकशी सुरु असतानाच आता ठराविक काही कंपन्यांनाच गाळ सफाईचे काम मिळावे यासाठी मायनिंगसाठी वापरण्यात येणाऱ्या पोकलेन मशिनचा वापर करण्याची अट निविदेत घालण्यात आली होती.

(हेही वाचा – Myanmar Earthquake : म्यानमार भूकंपामध्ये ३००० नागरिकांचा मृत्यू; १७०० जखमी)

मात्र, याबाबतची निविदा अंतिम झाल्या आहेत. या निविदेत नदीतून गाळ काढण्यासाठी १०५ फुट लांब बूम आणि दीड क्युबिक मीटर क्षमतेचे बकेट असणारे पोकलेन मशीन तैनात करण्याची अट घालण्यात आली होती. परंतु कमी बोली लावून यासाठी काम पात्र ठरलेल्या कंपनीला केवळ यासाठी या पोकलेन मशीन करता करारपत्राची प्रत न दिल्यामुळे एका गटाचे काम दुसऱ्या क्रमांकावरील कंपनीला देण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

महापालिकेच्यावतीने मिठी नदीच्या (Mithi River) पहिल्या भागासाठी पात्र ठरलेल्या त्रिदेव कंस्ट्रक्शन आणि दुसऱ्या टप्प्यातील पात्र ठरलेल्या भूमिका कंस्ट्रक्शन कपंनीच्या माध्यमातून प्रत्यक्षात कामाला सुरुवात झाली आहे. तर तिसऱ्या टप्प्यातील टिचर कॉलनी ते बीकेसी कनेक्टर पुलापर्यंतच्या कामासाठी लघुत्तम ठरणाऱ्या कंपनीला पोकलेन मशीन संदर्भात एनओसी तथा कराराची प्रत सादर न करता आल्याने महापालिकेने दुसऱ्या क्रमांकावरील जेआरएस इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीची निवड केली आहे. त्यामुळे या तिसऱ्या भागातील मिठी नदीच्या कामाला मंजुरी मिळाल्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे.

(हेही वाचा – Uddhav Thackeray खरे की खोटे?)

मिठी नदीच्या (Mithi River) कामांमध्ये गाळ काढण्यासाठी १०५ फुट लांब बूम आणि दीड क्युबिक मीटर क्षमतेचे बकेट असणारे पोकलेन मशीनचा वापर करण्याची अट ही काही कंपन्यांना डोळयासमोर ठेवूनच टाकली गेली होती. परंतु यामध्ये एकच कंपनी दोन कामांमध्ये लघुत्तम ठरल्याने दोन्ही ठिकाणची कामे संबंधित कंपनीला देणे बंधनकारक असताना पोकलेन मशीनची सेवा घेणाऱ्या कंपनीने त्यांची अडवणूक करून त्यांच्याशी करार न केल्याने पात्र असूनही संबंधित कंपनीला दुसऱ्या भागातील काम मिळवता आलेले नाही अशी माहिती मिळत आहे. त्यामुळे ज्या बाबींसाठी संबंधित कंपनी न्यायालयात गेली होती, तीच भीती प्रत्यक्षात निविदा खुल्या झाल्यानंतर दिसून आल्याने मिठीच्या सफाईच्या कामांमधील कंत्राटदारांचे संगनमत उघड होत आहे.

दरम्यान, नालेसफाईच्या कामाला सुरुवात झाली असून आतापर्यंत ७ लाख ३९ हजार ९८८ मेट्रिक टनच्या तुलनेत २५८१ मेटीक टन एवढाच गाळ काढला गेला आहे. हा गाळ पश्चिम उपनगरांमधील नाल्यांचा असून शहर आणि पूर्व उपनगरांमधील नाल्यांच्या सफाईला अद्यापही सुरुवात झालेली नाही, असे दिसून येत आहे. (Mithi River)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.