Mithi River Project : मिठी नदी  प्रकल्प: पवईतील मोरारजी नगर मधील १६६ बांधकामे हटवली

मिठी नदी सेवा रस्त्याचे अंदाजे ३५० मीटर लांबीचे काम हाती घेण्यात येणार आहे.

153
Mithi River Project : मिठी नदी  प्रकल्प: पवईतील मोरारजी नगर मधील १६६ बांधकामे हटवली
Mithi River Project : मिठी नदी  प्रकल्प: पवईतील मोरारजी नगर मधील १६६ बांधकामे हटवली
मुंबई महानगरपालिकेच्या ‘एस’ विभाग कार्यालयांतर्गत मिठी नदी (Mithi River Project) पुनरूज्जीवन प्रकल्पात बाधित पवई मोरारजी नगर येथील एकूण १६६ बांधकामे बुधवारी २२ नोव्हेंबर २०२३ तोडण्यात  आली. आता याठिकाणी मिठी नदी सेवा रस्त्याचे अंदाजे ३५० मीटर लांबीचे काम हाती घेण्यात येणार आहे.
महानगरपालिकेचे उप आयुक्त (परिमंडळ ६)  देवीदास श्रीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली, एस विभागाचे सहायक आयुक्त (प्रभारी)  भास्कर कसगीकर यांच्यासह सहाय्यक अभियंता (परिरक्षण) विभागातील अधिकारी व कामगार यांच्याद्वारे ही  कार्यवाही पार पडण्यात आली.
मिठी नदी पुनरूज्जीवन प्रकल्प हा बृहन्मुंबई महानगरपालिकेचा अत्यंत महत्वाचा प्रकल्प (Mithi River Project) आहे. अत्यावश्यक नागरी सेवा प्रकल्पांतर्गत सदर प्रकल्प वर्गीकृत आहे. त्यामुळे नदी किनाऱ्याची ही बांधकामे हटवणे गरजेचे होते. आता याठिकाणी मिठी नदी सेवा रस्त्याचे अंदाजे ३५० मीटर लांबीचे काम महानगरपालिकेच्या पर्जन्य जलवाहिनी विभागाकडून तातडीने सुरु करण्यात येणार आहे.
या कामामुळे मिठी नदी प्रकल्पातील ‘एस’ विभागांतर्गत येणारा टप्पा पूर्ण होणार आहे. ही बांधकामे तोडण्या  पूर्वी बाधित बांधकामधारकांची बैठक घेऊन त्यांना प्रकल्पाचे महत्व समजवण्यात आले. त्यानुसार बुधवारी  २२ नोव्हेंबर २०२३ पोलिस बंदोबस्तात व स्थानिक नागरिकांच्या सहकार्याने सदर निष्कासन कारवाई यशस्वीरीत्या पार पाडण्यात आल्याची माहिती सहायक आयुक्त भास्कर कसगीकर यांनी दिली. ही कार्यवाही करण्यासाठी १ पोकलेन, १ जेसीबी, २ डंपर तसेच २० अधिकारी, ७० कामगार व ५० पोलिस कर्मचारी तैनात होते, असे त्यांनी सांगितले.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.