विशेष प्रतिनिधी,मुंबई
मालाड मधील चारकोप नाका (Charkop naka) येथील अथर्व कॉलेज च्या समोरील अतिक्रमित जागेवरील बांधकामे हटवल्यानंतर या भूखंडावर आता मियावकी गार्डनसह या उदयानाचा विकास केला जात आहे. त्यामुळे या मियावकी गार्डनसह (Miyawaki Garden) इतर वृक्षांची लागवड करत याठिकाणच्या भूखंडाचा विकास केला जात आहे.
बांधकामे हटवून मोकळा केला भूखंड
मालाड चारकोपर परिसरातील अथर्व कॉलेजच्या आसपासच्या परिसरात असलेल्या आरक्षित जागेवरील भूखंडावर मोठ्याप्रमाणात अतिक्रमण झाले होते. यासंदर्भात उपनगराचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या अध्यक्षतेखाली जानेवारी २०२३ रोजी बैठक पार पडली आणि त्यामध्ये या भूखंडाचा विकास करण्याचा निर्णय घेतला गेला. त्यानुसार महापालिका आयुक्त तथा प्रशासक इक्बालसिंह चहल यांच्या निर्देशांनुसार या भूखंडावर अस्तित्वात असलेल्या बांधकामाना रितसर नोटिसा बजावून २६ ऑक्टोबर २०२३ रोजी त्या बांधकामांवर पी उत्तर विभागाचे सहायक आयुक्त किरण दिघावकर यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली.
(हेही वाचा – Lucknow University : लखनौ विद्यापिठाची मोगलाई; शिवजयंती कार्यक्रमाला अनुमती नाकारली)
साडेतीन कोटींचा होणार खर्च
ही कारवाई करण्यात आल्यानंतर या ठिकाणी पुन्हा अतिक्रमण होऊ नये म्हणून पत्र्याचे कुंपण घालण्यात आले होते. त्यानुसार महापालिकेच्यावतीने संरक्षक भिंतीचे बांधकाम, सुरक्षारक्षकांच्या खोली बांधणे, तसेच मियावाकी उद्यान वृक्षारोपण आदी प्रकारची कामे करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार, मियावकीचे काम करण्यात आले असून संरक्षक भिंतीचे बांधकाम तर कामे केली जाणार आहे. यासाठी सुमारे साडेतीने कोटी रुपये खर्च केले जात आहेत. यासाठी आर.एस. कंस्ट्रक्शन कंपनीची निवड करण्यात आली आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community