Mizoram disaster: मिझोराम बांधकाम सुरु असलेला पूल कोसळला ,अनेकजण ढिगाऱ्याखाली

घटनेच्या वेळी पुलावर 35 ते 40 मजूर काम करत होते. बैराबी ते सायरंग जोडणाऱ्या कुरुंग नदीवर हा पूल बांधला जात होता. प्रशासनाकडून बचावकार्य सुरू आहे.

137
मिझोराम बांधकाम सुरु असलेला पूल कोसळला ,अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकले
मिझोराम बांधकाम सुरु असलेला पूल कोसळला ,अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकले

मिझोराममध्ये बुधवारी बांधकाम सुरू असलेला रेल्वे पूल कोसळून १७ कामगारांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना बुधवारी( २३ऑगस्ट )रोजी घडली. मिझोरामची राजधानी आयझॉलपासून २१ किमी अंतरावर असलेल्या सैरांगमध्ये सकाळी १० वाजता हा अपघात झाला. मिझोराम चे मुख्यमंत्री झोरामथांगा यांनी देखील ट्विट करून या घटने बद्दल दुःख व्यक्त केले आहे.

घटनेच्या वेळी पुलावर ३५ ते ४० मजूर काम करत होते. बैराबी ते सायरंग जोडणाऱ्या कुरुंग नदीवर हा पूल बांधला जात होता. प्रशासनाकडून बचावकार्य सुरू आहे. ​​​​​​मिझोरमचे मुख्यमंत्री जोराम थांगा यांनी अपघाताचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. प्रशासन मदत कार्य करत असल्याचे त्यांनी म्हटले. तसचे जखमींच्या दीर्घायुष्यासाठी त्यांनी प्रार्थना केली. मृतांना दोन लाख व जखमींना ५० हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.

(हेही वाचा :  Konkan Railway : गणेशोत्सवासाठी कोकणातील गाडयांना अतिरिक्त कोच)

तिसऱ्या आणि चौथ्या पिलरमधील गर्डर ३४१ फूट खाली कोसळला पुलामध्ये एकूण चार पिलर आहेत. व्हडिओमध्ये तिसऱ्या आणि चौथ्या पिलरमधील गर्डर तुटल्याने खाली पडल्याचे दिसत आहे. सर्व मजूर याच गर्डरवर काम करत होते. जमिनीपासून पुलाची उंची १०४ मीटर म्हणजे ३४१ फूट आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.