राज्य शासनाच्या विविध शाळा (School) आणि वसतिगृहांमध्ये माध्यान आहारात (mid day meal) अंडी (eggs) आणि मांसाहार पूर्णपणे बंद करुन, विद्यार्थी-विद्यार्थिनींना सात्विक म्हणजेच फक्त शाकाहारी (vegetarian) अन्न द्यावे, अशी मागणी अपक्ष आमदार गीता जैन यांनी सोमवारी, १८ डिसेंबर रोजी विधानसभेत केली.
पश्चिमात्य देशही शाकाहारी जीवनपद्धतीचे अनुकरण
“वेदापासून अनेक पुराणांमध्ये याच शाकाहारी जीवन पद्धतीचा प्रचार, प्रसार आणि त्यापासून होणारे फायदे अधोरेखित केलेले आहे. आपले शरीर हे सृष्टीतील नैसर्गिक तत्वांनी बनले असून याच नैसर्गिक तत्वांचा समतोल राखूनच आपण आदर्श जीवनपद्धती लागू करतो. आज अनेक पश्चिमात्य देशही आपल्या शाकाहारी जीवनपद्धतीचा अभ्यास करून त्याचे अनुकरण दैनंदिन जीवनात करत आहेत, असे त्यांनी सांगितले.
(हेही वाचा Terrorism : दहशतवाद्यांच्या निशाण्यावर महाराष्ट्र…?)
शाकाहारी एक आदर्श जीवनपद्धती (life style)
“शाकाहारी जीवन पद्धती ही एक आदर्श जीवनपद्धती असून आपले विद्यार्थी हे भावी नागरिक असल्याने त्यांच्या प्राथमिक जीवनापासून त्यांना जर या सात्विक जीवनपद्धतीची ओळख झाली आणि ती अनुभवता आली तर निश्चितच भविष्यात ते एक आदर्श नागरिक म्हणून देशाच्या विकासात मोलाचा सहभाग बनतील, असे जैन यांनी स्पष्ट केले.
अंड्याइतकेच प्रथिने (proteins) कडधान्यात
तरी कृपया मांसाहार देण्याच्या निर्णयाचा फेरविचार करावा. डॉक्टर तसेच आहारतज्ञ यांच्या मते कडधान्य, मोड आलेले धान्य तेवढेच प्रोटीन देतात जेवढे एका अंड्यातून मिळते. त्यामुळे कुणाच्याही धार्मिक भावना न दुखावता आपण फक्त आणि फक्त शाकाहार शाळेमध्ये (School) आणि वसतिगृहांमध्ये द्यावा, अशी मागणी जैन यांनी केली.
Join Our WhatsApp Community