Sada Saravankar : आमदारकीच्या उमेदवारीसाठी उद्धव ठाकरेंनी माजी मुख्यमंत्र्यांचे घर जाळायला सांगितलं, सदा सरवणकरांचा गौप्यस्फोट

182
Sada Saravankar : आमदारकीच्या उमेदवारीसाठी उद्धव ठाकरेंनी माजी मुख्यमंत्र्यांचे घर जाळायला सांगितलं, सदा सरवणकरांचा गौप्यस्फोट
Sada Saravankar : आमदारकीच्या उमेदवारीसाठी उद्धव ठाकरेंनी माजी मुख्यमंत्र्यांचे घर जाळायला सांगितलं, सदा सरवणकरांचा गौप्यस्फोट

शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी मोठा गौप्यस्फोट करत ठाकरे गटाचे प्रमुख पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. सरवणकर यांच्या आरोपामुळे खळबळ उडाली आहे.

शिवसेनेतून बंडखोरी केल्यानंतर सत्तेत आलेल्या शिंदे गटाकडून ठाकरे गटाला सातत्याने लक्ष्य केले जात आहे. शिंदे गटातील आमदार उघडपणे उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना दिसत आहेत. अशातच शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. आमदारकीच्या उमेदवारीसाठी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी मनोहर जोशी यांचे घर जाळायला लावले असा गौप्यस्फोट सदा सरवणकर यांनी केला आहे.

(हेही वाचा – G-20 Summit : ‘नवी दिल्ली लीडर्स डिक्लेरेशन’चा स्वीकार करून इतिहास रचला, पंतप्रधान नरेंद्र मोदी जी-20 सदस्यांचे मानले आभार )

‘मला मनोहर जोशींनीच मातोश्रीवर उमेदवारी मागायला ताकद दाखवण्यास सांगितले होते. मात्र मनोहर जोशी यांनीच उमेदवारी कापली असे सांगत त्यांच्या घरावर हल्ला करायला सांगितले असा उद्धव ठाकरे यांचा निरोप मला मिलिंद नार्वेकर यांनी दिला. तर संजय राऊत यांनी जाताना पेट्रोल पंप लागतो तिथून पेट्रोल घेऊन घर पूर्ण जाळून टाका, काही शिल्लक ठेऊ नका असा फोन केला होता. त्यामुळे मनोहर जोशींच्या घरावर हल्ला केला’, अशी जाहीर कबुली सदा सरवणकर यांनी कोल्हापुरात दिली आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.